`हिंदू धर्म संपवण्यासाठी जादूटोणाविरोधी विधेयकाचा डाव`
जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर विधानपरिषदेतही मांडण्यात आलंय. विधानपरिषदेत या विधेयकाला विरोध करताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी ‘हे विधेयक म्हणजे हिंदू धर्म संपवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं घेतलेली सुपारी आहे’ असा गंभीर आरोप केलाय.
Dec 17, 2013, 10:34 AM ISTविधानपरिषदेत जादूटोणाविरोधी विधेयक संमत होणार?
विधानपरिषदेत आज जादूटोणाविरोधी विधेयक संमत होण्याची शक्यता आहे. हे विधेयक कालच विधानपरिषदेत मांडण्यात आलंय. या विधेयकातल्या तरतूदींना शिवसेना-भाजपचा विरोध आहे. तरी हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे आज या विधेयकावर शिक्कामोर्तब होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
Dec 17, 2013, 09:46 AM IST`जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध कायम`
जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत वटहुकूम जारी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरीही ‘आपला या विधेयकाला विरोध कायम राहील’ असं सनातन संस्थेनं स्पष्ट केलंय. त्याच्यापाठोपाठ वारकऱ्यांनीही आपला या विधेयकाला विरोध दर्शवलाय.
Aug 22, 2013, 11:45 AM IST