नोटाबंदी

नोटाबंदीमुळे गुजरातमधील कर्मचाऱ्यांना दिले जातेय आगाऊ वेतन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्याचे जाहीर केल्यानंतर गुजरात औद्योगिक विकास प्राधिकरणमधील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुढील काही महिन्यांचा आगाऊ पगार दिलाय.

Nov 24, 2016, 09:11 AM IST

नोटाबंदी आणि संसदेतील कोंडी : मोदी सरकार विरोधकांपुढे झुकण्याची चिन्हं!

संसदेतील कोंडी सातव्या दिवशी फुटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. आधी मी कोणतीही चर्चा करणार नाही, असे मोदींनी म्हटले होते.

Nov 24, 2016, 08:20 AM IST

मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा ठाकरे बंधुंना फटका

नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम जसा सर्वसामान्यांवर होतोय, तसा तो राजकीय नेत्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांवरही होतोय. मोठ्या गाजावाजात सुरु झालेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शाखा भेटींचे दौरे, त्यामुळे काही दिवसांतच गुंडाळावे लागल्याचं चित्र आहे. 

Nov 23, 2016, 07:13 PM IST

नोटाबंदीनंतर शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेंनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर थांबलेल्या रब्बी पेरण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. ग्रामीण बँकांमधून शेतकऱ्यांना पैसे देत बियाणं आणि खतं खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचे रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना आदेश दिलेत.  

Nov 23, 2016, 11:30 AM IST

गुजरातमध्ये आढळली 2000ची नकली नोट

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अद्याप सगळ्या लोकांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा पोहोचल्या नाहीत तोच 2000ची नकली नोट आढळल्याचे प्रकरण समोर आलेय.

Nov 23, 2016, 10:21 AM IST

दोन्ही सदनात नोटाबंदीवरून विरोधकांचा पुन्हा गोंधळ

लोकसभा आणि राज्यसभेत आज नोटाबंदीच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला. मोदींनी राज्यसभेत येऊन विरोधकांना उत्तर द्यावं या मागणीसाठी राज्यसभेत सलग पाचव्या दिवशी गोँधळ झाला.  तर चर्चेनंतर मतदान घेण्याच्या मागणीसाठी लोकसभेत गोधळ बघायला मिळला.  

Nov 22, 2016, 09:54 PM IST

नोटाबंदीवर पंतप्रधान मोदींनी मागितल्या जनतेच्या प्रतिक्रिया

केंद्र सरकारने नोटांवर घातलेल्या बंदीवर नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षाकडून तर या मुद्द्यांवर संसदेत जोरदार गदारोळ सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाते पहिले तीन दिवस तर या गदारोळातच गेले.

Nov 22, 2016, 03:29 PM IST

लातूरमध्ये बँकेच्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

लातूरच्या उदगीर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार कर्मचा-यांना निलंबित करण्यात आलंय. 

Nov 22, 2016, 01:23 PM IST

नोटाबंदीनंतर पेटीएमला लोकांची मोठी पसंती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आणल्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच पेटीएमचा वापर करण्याचे प्रमाण मोठे वाढलेय. 

Nov 22, 2016, 08:40 AM IST

नोटाबंदीचा पंधरवडा उलटला तरी गर्दी कायम...

नोटाबंदीचा पंधरवडा उलटला तरी गर्दी कायम... 

Nov 21, 2016, 07:48 PM IST

नोटाबंदीनंतर बँकेमध्ये जमा झाले ५,११,५६५ कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरच्या रात्री ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर ९ आणि १० नोव्हेंबरला बँक बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर नोटा बदली करण्याची प्रक्रिया सुरु झाली.

Nov 21, 2016, 03:48 PM IST