पतंगराव कदम

माळीण दुर्घटना : मृतांचा आकडा 82 वर, प्रचंड दुर्गंधी

माळीण गावात झालेल्या भुस्खलन आपत्तीत मृतांचा आकडा वाढतच आहे. आतापर्यंत 82 मृतदेह चिखलातून बाहेर काढण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जवळपास १०० लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, वाड्या-वस्त्यांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Aug 2, 2014, 07:13 AM IST

धक्कादायक, ४ महिन्यात ५६० शेतकऱ्यांची आत्महत्या

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांच्या कालावधीत 560 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती आज मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..

Jun 10, 2014, 08:25 PM IST

जळालेल्या फळबागांना सरकारचा ठेंगा

पूर्णपणे जळालेल्या फळबागांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारनं ठेंगाच दाखवल्याचं सत्य समोर आलंय. खुद्द राज्याचे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदमांच्या बोलण्यातूनच हे सत्य उघड झालंय.

May 22, 2013, 11:09 PM IST

`राज आणि अजित पवारांमधील युद्ध दुर्दैवी`

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरु असणारे युद्ध दुर्दैवी असल्याची टीका वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली. सांगलीमध्ये कदम प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Mar 3, 2013, 07:44 PM IST

दुष्काळ निवारणासाठी २ हजार ६२५ कोटी

राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने २ हजार ६२५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलीय. विधानसभेत दुष्काळ स्थितीबाबत झालेल्या जोरदार चर्चेनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी ही घोषणा केलीय.

Jul 12, 2012, 09:30 AM IST

योजना काँग्रेस सरकारच्या, प्रसिद्धी उद्घाटनकर्त्यांना

राज्यात सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या योजना काँग्रेस सरकारच्या असतात नाव मात्र उद्घाटन करणाऱ्या मंत्र्याचं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला. कार्ल्यात सुरु असलेल्या काँग्रेस सेवादलाच्या शिबिरात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं.

Jun 2, 2012, 07:14 PM IST

वाघ, राज आणि वनमंत्री

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा दौरा केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वाघ वाचवण्यासाठी पुढाकार घेतलाय..शिकारी टोळ्यांची माहिती देणा-यांना, तसंच शिका-यांवर कारवाई करणा-या वनखात्यातील कर्मचा-यांना, मनसेकडून बक्षिस दिलं जाणार आहे.

Jun 2, 2012, 12:04 AM IST

ताडोबात राज ठाकरे, पतंगराव आमने-सामने

गेल्या काही दिवसांमध्ये व्याघ्र प्रकल्पात झालेल्या वाघांच्या शिकारी तसंच जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागून झालेल्या नुकसानीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. तर राज ठाकरेंच्या दौ-यापाठोपाठ आता वनमंत्री पतंगराव कदम हेही आज ताडोबा दौ-यावर जाणार आहेत.

May 30, 2012, 09:45 PM IST

दुष्काळासाठी आम्ही काहीच करत नाही- पतंगराव

दुष्काळावरुन रान पेटलेलं असताना आणि सिंचनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपली असतानाच पतंगरावांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. दुष्काळासाठी आम्ही कायमस्वरुपी काहीच करत नाही, चर्चा खूप होते पण प्रत्यक्षात आम्ही ठोस निर्णयच घेत नाही, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री खुद्द पतंगराव कदमांनीच म्हटलंय.

May 5, 2012, 09:18 PM IST

नेते करतायेत धावपळ दुष्काळ निवारणासाठी

राज्यातल्या दुष्काळाच्या झळा आता अधिकच तीव्र आणि राजकीय होऊ लागल्या आहेत. पश्चिम दुष्काळावरुन सर्वपक्षीय आमदारांची ओरड सुरु झाल्यानंतर आता दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून धावपळ सुरु झाली आहे.

Apr 11, 2012, 07:28 PM IST

अफू पिकाला मान्यता द्या- शेतकरी संघटना

राज्यभरात फोफावलेल्या अफूच्या पिकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असताना आता अफू पिकाला मान्यता मिळावी म्हणून शेतकरी संघटना आंदोलनाचं रणशिंग फुंकणार आहे.

Feb 29, 2012, 07:16 PM IST

अफूच्या शेतीवरून पोलिसच संशयाच्या फेऱ्यात

सांगलीतल्या अफूच्या शेती प्रकरणामुळं आता राजकीय नेत्यांनाही नशा चढू लागली आहे. अफूच्या शेतीवरुन वनमंत्री पतंगराव कदम यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलंय. पोलिसांनी हप्ते घेणं थांबवलं तर काम चांगलं होईल, असा टोला पतंगरावांनी हाणला आहे.

Feb 29, 2012, 04:06 PM IST

सांगलीमध्ये प्रतिष्ठेची झेडपी निवडणूक

सांगली जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांसाठी जिल्ह्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. सांगलीत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि पंचायत समितीचे १२४ गण आहेत.

Feb 7, 2012, 01:38 PM IST