पाऊस

मुसळधार पाऊस, गरज असेल तर बाहेर पडा : मुंबई पालिका

शहरात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अति महत्वाचे काम असल्‍याच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

Aug 29, 2017, 03:49 PM IST

मुंबईत पावसामुळे हाल

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सेवेवर झालाय. रेल्वेचा वेग मंदवलाय तर विमान सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत. शहरात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने पाण्यातून रस्ता शोधण्याची वेळ वाहनधारकांवर आलेय. रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्यागतीने सुरु आहे.

Aug 29, 2017, 03:03 PM IST

मुंबईला मुसळधार पावसाचा फटका, विमानसेवाही ठप्प

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सेवेवर झालाय. रेल्वेचा वेग मंदवलाय तर विमान सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत.

Aug 29, 2017, 02:06 PM IST

मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्यात

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेहाल झालेल्या मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले असून मुंबईच्या लाईफलाईनची सेवाही विस्कळीत झाली आहे.  

Aug 29, 2017, 01:20 PM IST

रायगड जिल्ह्यात येत्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा

जिल्ह्यात पुढच्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात ४ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सावित्री, कुंडलिका आणि आंबा नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

Aug 29, 2017, 09:24 AM IST

येत्या २४ तासात 'या' ठिकाणी कोसळणार मुसळधार

पुढच्या २४ तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 

Aug 29, 2017, 09:18 AM IST

सलग चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

सलग चार दिवस पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी सुरु झालेला पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही आहे. त्यामुळे गणेशभक्त चलबिचल असल्याचं पाहायला मिळतं आहे.

Aug 29, 2017, 09:16 AM IST

रत्नागिरी जिल्ह्यात सलग ४ दिवसापासून पाऊस

गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकूण 389.80 मिमी पाऊस पडलाय. तर सरासरी 43.31 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

Aug 28, 2017, 08:20 PM IST