पाकिस्तान

अफगाणिस्तानात पुन्हा शिरण्याचा तालिबानचा डाव!

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अतिरेक्यांविरूध्द लष्करी कारवाई करणाऱ्या नाटो फौजा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. नाटोच्या फौजा बाहेर पडल्यावर अफगाणिस्तानच्या सेनेवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. तर या सैन्याचा पाडाव करुन अफगाणिस्तान पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी तालिबान सज्ज होत आहे. तालिबानच्या या तयारी संदर्भातले वृत्त ‘द इंडिपेंडन्ट’ या ब्रिटीश वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलंय.

Oct 5, 2013, 06:17 PM IST

पाकमध्ये १८ हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन!

पाकिस्तानातील एका हिंदू परिवाराचे धर्मांतर करण्यात आलंय. परिवारातील सर्वच्या सर्व १८ सदस्यांनी आपला धर्म बदलवला आहे.

Oct 3, 2013, 05:28 PM IST

काश्मीरमध्ये तब्बल ४० दहशतवादी घुसलेत

काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एका गावात तब्बल ४० दहशतवादी घुसलेत.त्यांच्याशी आर्मीचा गेल्या १० दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दहशतवादी आणि आर्मी यांच्यात जोरदार गोळीबार सुरू आहे. आज चकमकीचा दहावा दिवस आहे.

Oct 3, 2013, 02:14 PM IST

श्रीनगरमधील अतिरेकी हल्ल्यात ५ पोलीस जखमी

श्रीनगर शहरातील सौरामधील अहमदनगर भागत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच पोलीस जखमी झाले आहेत. या भागात अतिरेकी घुसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी या भागाल घेरले. याचवेळी अतिरेक्यांनी बॉम्बहल्ला केला.

Oct 3, 2013, 09:11 AM IST

पाक सैन्याचा एलओसीवर पुन्हा गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातल्या मेंढर सेक्ट र इथं पाकिस्तान सैन्यानं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केलाय. मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास पाकनं गोळीबार सुरू केला. तासभर हा गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारताची हानी झालेली नाही, असं संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यानं स्पट केलंय.

Oct 2, 2013, 01:13 PM IST

पाकिस्तानी अभिनेत्री आरजू खानची हत्या

पाकिस्तानी अभिनेत्री आरजू खान हिची मुलतान येथे शनिवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली.

Sep 29, 2013, 06:21 PM IST

देशाच्या पंतप्रधानांचा अपमान सहन केला जाणार नाही- मोदी

पंतप्रधानांना देहाती खेडूत म्हणत नवाज शरीफ यांनी देशाचा अपमान केलाय. देशाचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही, असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफ यांना खडसावलंय.

Sep 29, 2013, 02:34 PM IST

दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम पाकनं बंद करावं- पंतप्रधान

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत गरजलेत. यावेळी त्यांनी पाकला खडेबोल सुनावले. पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र असून दहशतवादाला खतपाणी घालण्याचं पाकनं बंद करावं, अशी स्पष्ट भूमिका घेतली.

Sep 29, 2013, 09:19 AM IST

भूकंपानंतर पाकिस्तानात तीन नव्या बेटांचा उदय!

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात झालेल्या भूकंपामुळे तिथं समुद्रकिनाऱ्यावर तीन नव्या बेटांचा अचानक उदय झालाय.

Sep 28, 2013, 11:45 PM IST

पाकिस्तानात भूकंपानं हाहाकार; मृतांचा आकडा २०० वर

पाकिस्तानातील दक्षिण पश्चिम भागाला मंगळवारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा जोरदार झटका बसला. हा धक्का इतका भयानक होता की आत्तापर्यंत यामध्ये आपला जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या ८० वर पोहचल्याचं सांगण्यात येतंय तर ८० जण जखमी झालेत.

Sep 25, 2013, 10:25 AM IST

२६/११ : पाकचं न्यायालयीन पथक भारतात दाखल

मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा खटला पाकिस्तानातही सुरू आहे. याचसंबंधी आणखी काही जबाब नोंदविण्यासाठी पाकिस्तानचं एक न्यायालयीन पथक नुकतंच मुंबईत दाखल झालंय.

Sep 24, 2013, 01:18 PM IST

पाकिस्तान: पेशावरला चर्चमध्ये मानवी बॉम्ब फुटला- ४० ठार, ४५ जखमी

भीषण आत्मघातकी स्फोटानं पाकिस्तान हादरलंय. पेशावरमधील एका चर्चमध्ये आत्मघातकी स्फोट झालाय. स्फोटात ४० जण ठार झाले असून ४५ जण जखमी झाले आहेत.

Sep 22, 2013, 01:51 PM IST

पाक संघाला केंद्राच्या पायघड्या, व्हिसा मंजूर

पाकिस्तानने भारताविरोधात कारवाई करण्याचे थांबविले नसतानाही चॅम्पियन्स लीग टी-२० साठी भारतात येणाऱ्या पाक संघाला केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हिसा मंजूर केला आहे

Sep 13, 2013, 09:49 PM IST

पाकच्या राष्ट्रपतीपदी ममनून यांनी घेतली शपथ!

भारतात जन्मलेले आणि राष्ट्राध्यक्ष नवाझ शरीफ यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे ममनून हुसैन यांनी सोमवारी पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

Sep 10, 2013, 02:13 PM IST

दाऊद पाकिस्तानात, भारतात आणणार - गृहमंत्री शिंदे

अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३मधील मुंबई साखळी स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याला कोणत्याही परिस्थिती भारतात आणले जाईल. त्याला पकडण्यासाठी अमेरिकेबरोबर मोहीम राबविणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सांगितले.

Sep 9, 2013, 02:43 PM IST