महाराष्ट्रात उद्योगांसाठी कसे आहे वातावरण, 3 दिग्गज उद्योजकांनी सांगितली परिस्थिती

Maharashtra industries:  उद्योगधंद्याना प्रगती करायची असेल तर पोषक वातावरण गरजेचे आहे. याविषयी महाराष्ट्रातील उद्योजकांना काय वाटतं? जाणून घेऊया

Pravin Dabholkar | Updated: Oct 9, 2024, 06:27 PM IST
महाराष्ट्रात उद्योगांसाठी कसे आहे वातावरण, 3 दिग्गज उद्योजकांनी सांगितली परिस्थिती title=
महाराष्ट्रात उद्योगांसाठी वातावरण

Maharashtra industries: महाराष्ट्र हे वेगाने प्रगती करणारे राष्ट्र आहे. औद्योगिक बदल हा कोणत्याही राज्याच्या प्रगतीचा पाया असतो. उद्योगधंद्याना प्रगती करायची असेल तर पोषक वातावरण गरजेचे आहे. महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसाठी कसे वातावरण आहे? यावर राज्यातील 3 दिग्गज उद्योजकांनी भाष्य केले आहे. झी 24 तासच्या 'महाराष्ट्र एक पाऊल पुढे'माधवबागचे सीईओ आणि एमडी रोहित साने, नेचर केअर फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक जयदेव बर्वे आणि  पु. न. गाडगीळ अँड सन्सचे सीईओ अमित मोडक यांची प्रमुख उपस्थिती लावली. मुलाखतीदरम्यान त्यांनी विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. 

आयुर्वेद उपचार पद्धती सोपी आहे असं म्हणतात पण याला काही आव्हानंदेखील असतात.लोकांना सर्जरी करायला आवडत नाही.  सर्जरी न करता उपचार करणे यासाठी आम्ही काम करतो, असे माधवबागचे सीईओ रोहीत साने यांनी सांगितले.  सरकारी योजनांमुळे लोकांना कमी पैशात उपचार पद्धती मिळाली. आता आयुर्वेदासोबतदेखील हेच घडते. सरकारकडून मदत मिळते. ही इंडस्ट्री ऑर्गनाइज्ड करायची असेल तर लागणाऱ्या गोष्टी सरकारकडून मिळायला हव्यात असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढे आहे. आयुर्वेदाचा व्यवसाय अनेक पटीने इथे जास्त होतो, असेही त्यांनी सांगितले. 

आताची पिढी नटणं सजण यादृष्टीने बघते. गोल्ड ज्वेलरीमध्ये तुम्हाला लाइफस्टाइल मिळते. वापरुन झाल्यावर तुम्हाला बायबॅकदेखील मिळते, असे पु. न. गाडगीळ अँड सन्स चे सीईओ अमित मोडक यांनी सांगितले. शासनाकडून आम्हाला पोषक वातावरण मिळतंय, असेही ते म्हणाले.सराफा व्यवसायात नोकरीच्या संधी खूप आहेत. इथे वेगवेगळे कौशल्य असल्यांची गरज आहे पण मनुष्यबळ उपलब्ध नाही. ते उपलब्ध झालं तर आमचा व्यवसाय आणखी वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

जमीन खराब झाली आणि रसायनांचा वापर झाला तर वाढत्या लोकसंख्येला तुम्ही पुरे पडू शकत नाही, असे नेचर केअर फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक जयदेव बर्वे म्हणाले.पाण्यासाठी शासनाने भरपूर योजना राबवल्या. पाणी आल्यानंतर आमच्या भागाचा कायापालट झालाय. आता सिंचनाच्या व्यवस्था झाल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी माफक पाणी वापरावं. जमिन जिवंत राहिली तर तुम्हला पोषक वातावरण मिळून पिकं चांगल मिळेल. सर्व गोष्टी व्यवस्थित करुन संतुलन ठेवायला हवं, असे मत त्यांनी व्यक्त केले.