पाकिस्तान

परवेझ मुशर्रफ यांना हृदयविकाराचा झटका

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सुनावणीसाठी न्यायालयात निघालेल्या मुशर्रफ यांच्या छातीत अचानक दुखू लागले त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jan 2, 2014, 04:09 PM IST

पायलटला `सॅण्डविच`ची लहर; प्रवाशांवर केला कहर

एका सॅण्डविचसाठी पायलटनं दोन तास प्रवाशांची त्रेधातिरपीट उडविली... ही घटना घडलीय पाकिस्तानमध्ये...

Dec 16, 2013, 01:25 PM IST

माझ्या मुलांना पेशावरला न्यायचंय – शाहरुख खान

सुपर स्टार शाहरुख खानला त्याच्या तिन्ही मुलांना आर्यन, सुहाना आणि अबरामला पेशावरला घेवून जायची इच्छा आहे. कारण त्याच्या कुटुंबाचा संबंध पेशावर शहराशी आहे.

Dec 5, 2013, 10:14 AM IST

पाकिस्तान लष्करप्रमुखपदी राहिल शरीफ

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल राहिल शरीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्करप्रमुखपदाची नियुक्ती जाहीर केली.

Nov 28, 2013, 01:08 PM IST

... जेव्हा दरोडखोर रझाकच्या घरात शिरतात!

पाकिस्तान क्रिकेटर अब्दुल रझाक याच्या घरावर दरोडा पडलाय. यावेळी दरोडेखोरांनी अब्दुलला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरातच बांधून ठेवला आणि तिथून पळ काढला.

Nov 27, 2013, 06:11 PM IST

... आणि शोएब सचिनला घाबरला!

सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीला घाबरतो, असं विधान करणाऱ्या ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरला तोंडावर पाडलंय पाकिस्तानच्याच एका माजी कर्णधारानं... वसीम अक्रमनं.

Nov 24, 2013, 06:19 PM IST

सर जडेजानं पाकिस्तानी सईदला टाकलं मागे!

टीम इंडियाचे सर जडेजा म्हणजेच रवींद्र जडेजानं यंदाच्या सर्वाधिक विकेट घेण्याचा मान पटकवला आहे. त्यानं आपल्या रेकॉर्डनं यंदाच्या वर्षी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पाकिस्तानच्या सईद अजमलला पराभूत केलंय.

Nov 22, 2013, 02:22 PM IST

पाकिस्तानात भारतीय सिनेमांवर बंदी!

पाकिस्तानच्या एका न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार, संपूर्ण पाकिस्तानात भारतीय सिनेमांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आलीय.

Nov 19, 2013, 05:47 PM IST

भारतीय कार्यक्रम दाखवल्यानं पाकिस्तानी चॅनेलला १ कोटी रु. दंड

पाकिस्ताननं त्याचा मनाचा कोतेपणा पुन्हा एकदा दाखवलाय. पाकिस्तानातील दहा चॅनेल्सना भारतीय आणि परकीय भाषेतील जास्त कार्यक्रम दाखवल्याबद्दल १ कोटी रूपये दंड ठोठावण्यात आलाय. पाकिस्तानच्या माध्यम नियंत्रण मंड़ळानं या वाहिन्यांना पत्रं पाठवून दंड भरण्यास सांगितलंय. शिवाय यापुढं भारतीय भाषातील किंवा परदेशी भाषातील कार्यक्रम जास्त प्रमाणात दाखवला तर याद राखा, असा इशाराही दिला आहे.

Nov 19, 2013, 12:43 PM IST

मलालाच्या ‘आय एम मलाला’ पुस्तकावर पाक शाळेत बंदी

संयुक्त राष्ट्रसंघाने गौरविलेल्या आणि तालिबानी विचारांविरोधात आवाज उठविलेल्या पाकिस्तानी मलाला युसुफजाई हिच्या ‘आय एम मलाला’ पुस्तकावर पाकिस्तान शाळेत बंदी घालण्यात आली आहे.

Nov 12, 2013, 12:40 PM IST

दाऊदचा व्याही म्हणतो, सचिन निवृत्तीने काही फरक पडत नाही !

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीने भारताला काही फरक पडणार नाही, असे बेधड वक्तव्य दाऊदचा व्याही आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याने केले आहे.

Nov 12, 2013, 11:27 AM IST

जिलानी अमेरिकेत पाकिस्तानचे नवे राजदूत

अमेरिकेतील पाकिस्तानचे नवे राजदूत म्हणून जलील अब्बास जिलानी यांची नियुक्ती केली गेली आहे. जिलानी यांच्याकडे याआधी परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी होती.

Nov 9, 2013, 05:17 PM IST

‘लंबी जुदाई...’च्या गायिका रेश्मा यांचं निधन

जेष्ठ पाकिस्तानी पार्श्वगायिका रेश्मा यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ६६ वर्षांच्या होत्या. रेश्मा या घशाच्या कर्करोगामुळं त्रस्त होत्या. गेल्या महिनाभरापासून त्या कोमात होत्या. लाहोरमध्ये एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Nov 3, 2013, 11:29 AM IST

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं पितळ उघड!

‘दहशतवाद पुरस्कृत देश’ म्हणून घोषित करण्याचा अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतरही पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मे 1992मध्ये ‘आयएसआय` या पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला काश्मीरमधील आपल्या छुप्या कारवाया सुरूच ठेवण्यास सांगितलं होतं.

Nov 2, 2013, 06:55 PM IST

अमेरिकेचा ड्रोन हल्ला; पाकिस्तान तालिबानचा म्होरक्या ठार

पाकिस्तानात शुक्रवारी केल्या गेलेल्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी तालिबानचा म्होरक्या हकीमुल्ला महसूद याच्यासहीत आणखी सहा दहशतवादी मारले गेलेत.

Nov 2, 2013, 05:18 PM IST