सांगलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या?
दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.
Mar 10, 2013, 04:57 PM ISTबुलढाण्याला पाणीपुरवठा करणारं धरण कोरडं
बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारं येळगाव धरण 100 टक्के कोरडं झाल्यानं डिसेंबर महिन्यातच शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागलीय. शहरात 20 ते 22 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे महिला वर्गावर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलीय.
Dec 26, 2012, 08:03 PM ISTपाणीटंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्र पडणार बंद!
पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.
Jul 25, 2012, 09:43 AM IST'महा'राष्ट्रावर अंधारात जाण्याची नामुष्की?
पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.
Jul 25, 2012, 09:34 AM ISTपाणीटंचाईच्या झळा उद्योजकांनाही
सर्वसामान्य नाशिककर आणि शेतकरी पाणीटंचाईचा सामना करत असतानाच आता उद्योग क्षेत्रालाही त्याच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. मंदीतून सावरतो न सावरतो तोच आता पावसानं दगा दिल्यानं उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.
Jun 29, 2012, 10:23 PM ISTयवतमाळमध्ये भीषण पाणी टंचाई
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभारात नियोजनाचा अभाव असल्यामुळे यवतमाळ शहरात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. यवतमाळकरांची तहान भागवण्यासाठी असलेला निळोणा प्रकल्प आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी चार-पाच दिवस वाट पाहावी लागतेय.
Jun 10, 2012, 11:58 AM ISTनाशिककरांवर पाणीटंचाईचं संकट...
मान्सून समोर दिसत असला तरी, नाशिककरांसमोर मात्र पाणी टंचाईचं संकट उभं राहिलेलं दिसतंय. शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. शहरासाठी फक्त ७५० एमसीएफटी पाणी शिल्लक असल्यानं कमी दाबानं पाणीपुरवठा केला जातोय. अधिकृत घोषणा झालेली नसली तरी शहरात पाणीकपात होतेय. त्यामुळे नाशिककरांचे डोळे लागलेत ते पावसाकडे...
Jun 5, 2012, 04:07 PM ISTपाणी संपणार... आता करायचे काय?
धुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा कधी नव्हे इतका खालावला आहे. आगामी काही दिवसांतच जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
May 15, 2012, 09:09 PM ISTपाण्याची तहान ठरली जीवघेणी
वणवण करतांना ठाणे जिल्ह्यात घरासाठी पाण्याचे हंडे भरणाऱ्या पार्वती जाधव हिचा पाणी भरताना मृत्यू झाला आहे. विहिरीजवळच झालेल्या या मृत्यूने शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा करणारी योजनेतील फोलपणा उघड झालाये
Apr 23, 2012, 06:13 PM ISTइंद्रायणी काठी, पाण्याची टंचाई
राज्यातला बहुतांश भाग आज दुष्काळाच्या छायेत असल्याची चिन्ह आहेत. त्याला तीर्थक्षेत्रही अपवाद नाहीत. आळंदीमध्येही सरकारच्या उदासीनतेमुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.
Apr 22, 2012, 07:53 PM ISTविदर्भात पाण्यासाठी वणवण
वाढत्या पाऱ्यासोबतच विदर्भात पाण्यासाठीची वणवणही वाढीस लागली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पाणीप्रश्न गंभीर झालाय. एप्रिलमध्येच ही परिस्थिती असताना, संपूर्ण मे महिन्यात काय होणार, याची भीता साऱ्यांनाच वाटतेय.
Apr 10, 2012, 01:11 PM ISTउंच टॉवरमुळे मुंबईत पाणी समस्या
दक्षिण मुंबईचा महत्वाचा भाग असणारा करी रोड, लोअर परेल, चिंचपोकळी चा परिसर. या भागात अशाच बैठ्या चाळी पाहायला मिळतात. चहुबाजुंनी ह्या परिसराला मोठमोठ्या टॉवरनी वेढलय. मात्र हेच मोठाले टॉवर या स्थानिकांसाठी पाणी टंचाईचं कारण ठरतायत.
Dec 3, 2011, 03:13 PM IST