मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा कायम
बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार पडलेल्या पावसानं पुन्हा एकदा मराठवाड्यात दडी मारली आहे. खरंतर गणेश उत्सवापूर्वी मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली त्यामुळं सरासरी गाठेल अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली अजूनही मराठवाड्यात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मराठवाड्याची वार्षिक सरासरी 779 मिमी इतकी आहे. मात्र आतापर्यंत फक्त 456 मिमी इतका पाऊस झाला आहे. 58.65 टक्के इतकाच पाऊस मराठवाड्यात झाला आहे.
Sep 6, 2017, 04:29 PM IST