वर्षभरापूर्वी मंत्रालयाला आग, शासनालाही अजूनही नाही जाग!
मंत्रालयाला लागलेल्या आगीला आज एक वर्ष पूर्ण होतंय. मात्र एक वर्षानंतरही मंत्रालयाचा कारभार अजूनही विस्कळीतच आहे. मंत्रालयातील घडी पूर्णपणे बसवण्यात एका वर्षानंतरही शासनाला यश आलेलं नाही.
Jun 21, 2013, 08:33 AM ISTउद्धव ठाकरेंना सुनील तटकरेंचा टोला
अजित पवारांच्या राजीनाम्याच्या धाडसामागे मंत्रालयाला लागलेली आग कारणीभूत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी उत्तर दिलंय.
Oct 5, 2012, 04:55 PM ISTमुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार
मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.
Jun 22, 2012, 04:57 PM ISTमंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही
राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे
Jun 22, 2012, 04:27 PM ISTमंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार
मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.
Jun 22, 2012, 04:17 PM IST