मराठा आरक्षण

Maharastra Politics : कुणबी नोंदीवरून संघर्षाची नांदी! शिंदे समिती बरखास्त की भुजबळ राजीनामा देणार?

Maratha quota agitation : कुणबी नोंदी शोधणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीवरून महाराष्ट्रातलं राजकारण (Maharastra Politics) तापलंय. एकीकडं ही समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) दंड थोपटलेत. तर दुसरीकडं भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी पुढं आलीय. पाहा नेमकं चाललंय तरी काय?

Nov 27, 2023, 08:20 PM IST

छगन भुजबळ एकाकी पडलेत? शिंदे समिती बरखास्त करण्याच्या मागणीला सर्व नेत्यांचा विरोध

भुजबळांच्या शिंदे समिती बरखास्तीच्या मागणीला मंत्र्यांनी तीव्र विरोध केला आहे. कॅबिनेटमध्ये एकमतानं निर्णय झालेला असताना उघडपणे बोलणं योग्य नाही अस म्हणत शिंदे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी भुजबळांवर टीका केली.

Nov 27, 2023, 07:26 PM IST

भुजबळांना रोखा जरांगेंची मागणी, तर आमदारांची घरं कुणी पेटवली? भुजबळांचा सवाल

Maratha vs OBC Reservation : छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. जातीवाचक बोलणाऱ्या भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर बीडमध्ये आमदारांची घरं कोणी पेटवली असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. 

Nov 27, 2023, 06:44 PM IST

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना छत्रपकी संभाजी नगर रुग्णालयात दाखल केले आहे. 

Nov 26, 2023, 07:53 AM IST

अजित पवार गटाला धक्का, छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार?

Maratha vs OBC Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यात आता मनोज जरांगे यांनी मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे. 

Nov 23, 2023, 02:49 PM IST

'भुजबळांचं सर्व माहितीय' बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट

Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा आजचा 8 वा दिवस आहे. नाशिकला त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन जरांगेंनी आजच्या दिवसाची सुरुवात केली. मंत्री छगन भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यात 2 सभा घेऊन जरांगेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं

Nov 22, 2023, 06:27 PM IST

Maratha Reservation : 'मेरिटवर आरक्षण द्या' म्हणाऱ्या उदयनराजेंनी जरांगेंना काय दिला कानमंत्र?

Udayanraje bhosale Advice to Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी रान पेटवलंय. मराठ्यांना सरसकट कुणबीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी केलीय. त्यावर आता उदयनराजेंनी जरांगेंना कानमंत्र दिला आहे.

Nov 18, 2023, 08:35 PM IST

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नवा कायदा? ओबीसीतून मराठा आरक्षण नाहीच?

Law for Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा आणला जाण्याची शक्यता आहे. सरकार आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Nov 17, 2023, 09:11 PM IST

'मनोज जरांगेंनी कट रचत पोलिसांवर हल्ला केला' छगन भुजबळांचा गंभीर आरोप

OBC Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी कट रचून पोलिसांवर हल्ला केला, असा खळबळजनक आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. तर लाठीचार्जनंतर रोहीत पवार आणि राजेश टोपे यांनी पवार येणार असल्याचं सांगून जरांगेना उपोषणाला बसवलं असा गौप्यस्फोचही भुजबळ यांनी केलाय.

Nov 17, 2023, 05:02 PM IST

जरांगेंच्या पाठीशी कोण? मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही, राज ठाकरेंचा दावा

Raj Thackeray : मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे , मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे.  25 डिसेंबरला जरांगे सांताक्लॉज बनून येणार का असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. 

Nov 16, 2023, 02:00 PM IST

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या 35 जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांचं वाटप

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजाची आरपारची लढाई सुरु आहे. यादरम्यान गेल्या काही दिवसात मराठा समाजातील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्यात. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशा कुटुंबाना आरोग्य डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आर्थिक मदत पुरवण्यात आली.

Nov 9, 2023, 09:28 PM IST

'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको' छगन भूजबळांच्या भूमिकेवरुन महायुतीत तणाव

मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तसंच दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आरक्षणावरुन अजितदादा विरुद्ध भुजबळ खडाजंगीं होण्याची चिन्ह आहेत.

Nov 8, 2023, 01:27 PM IST

Maharastra Politics : छगन भुजबळ यांच्या 'व्हायरल ऑडिओ क्लिप'वर मनोज जरांगे यांचं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange :  आम्हाला अजून आरक्षण मिळाले नाही मग आम्ही अतिक्रमण कुठं केले आणि आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचे आहे. कोण काय टीका करेल याकडे आम्ही लक्ष देणार नाही, असं मनोज जरांहे भूजबळांच्या ऑडिओ क्लिपवर म्हणाले आहेत.

Nov 6, 2023, 05:33 PM IST

Maratha Reservation : मनोज जरांगे यांचा राज्यव्यापी दौरा! दगा फटका झाल्यास जरांगेंचा 'प्लॅन बी' काय?

Manoj Jarange Patil : येत्या एक तारखेपासून गावागावात साखळी उपोषण सुरू होईल. ज्या गावात आधीपासून आहे तिथे राहीलच आणि नव्याने गावांचा समावेश होईल असेही जरांगे पाटील म्हणाले.

Nov 5, 2023, 09:16 PM IST

Maratha Reservation : मुख्यमंत्री म्हणतात, टिकणारं आरक्षण देऊ...; 'सरसकट' शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम!

Maratha Reservation : मी परवा जरांगे यांच्याशी बोललो होतो. त्यांना मी सांगितलं होतं की टिकणारं, कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कुणबी नोंदी सापडताहेत त्यांना तपासून आपण लगेच प्रमाणपत्र देणे सुरु केले आहे, असं मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत.  मात्र, सरसकट शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 2, 2023, 10:41 PM IST