मीरा-भाईंदर पालिकेसाठी मतदानाला सुरुवात
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमधील ९५ वॉर्डसाठी आज निवडणूक होत आहे. त्यासाठी
आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, आज ९४ वॉर्डसाठीच मतदान होणार आहे. निवडणुक, सुरक्षा यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.
मीरा-भाईंदर महापलिका निवडणूक : राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेत दाखल
आता आगामी मीरा-भाईंदर महापलिका निवडणुकीसाठी शिवसेनेत इनकमींग सुरु झाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर हे इनकमींग सुरु झाल्याने राजकीय चुरस वाढली आहे.
Apr 25, 2017, 03:58 PM IST