बाबा दिल्लीत; नवीन चेह-यांना संधी?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची १० जनपथवर भेट घेतली. त्यांच्यासह सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हेदेखील त्यांच्यासोबत होते.
Sep 24, 2012, 04:30 PM ISTबाप्पा सर्वकाही ठिक करतील - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या `वर्षा` या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचं आगमन झालंय.
Sep 19, 2012, 05:59 PM ISTसेना-मनसे समाजात फूट पाडताहेत - सीएमचा टोला
काही पक्षांनी समाजात फूट पाडू नये. फूट पाडणा-यांना सरकार कायदा हातात घेऊ देणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता शिवसेना-मनसेला दिलाय.
Sep 7, 2012, 05:12 PM ISTराज्याला केंद्राकडून मिळेल मदत - मुख्यमंत्री
दुष्काळ निवारणासाठी राज्याला सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असं आश्वासन दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आलय. यासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बैठक दिल्लीत पार पडली.
Aug 25, 2012, 11:54 AM ISTराज करतोय सेनेकडचं हिंदुत्व हायजॅक- मुख्यमंत्री
‘आझाद मैदान येथे 11 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसेच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी काढलेला मोर्चा म्हणजे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न आहे’, असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पोलिसांची सहानुभूती मिळवण्यासाठीच राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे.
Aug 21, 2012, 03:50 PM IST‘तपास सुरू आहे...’ दॅटस् इट!
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर दोघांनीही सारखीच प्रतिक्रिया दिलीय... दोघंही म्हणाले ‘अधिक काही बोलता येणार नाही, तपास सुरु आहे...’
Aug 5, 2012, 03:54 PM ISTपवारांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री दिल्ली दरबारी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्लीदरबारी दाखल झाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली. दहा जनपथवर सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांच्यावर शरद पवारांनी टीका केली होती.
Jul 30, 2012, 04:44 PM ISTपवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
राज्यातलं सरकार दोन्ही पक्षांचे आहे. त्यामुळं एकतर्फी निर्णय चालणार नाही अशा कडक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना सुनावले आहे. मुख्यमंत्री बदलण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही नसल्याचं सांगत काँग्रेसचा मुख्यमंत्री चालणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
Jul 28, 2012, 09:58 PM ISTदिल्लीत NCPची महत्वाची बैठक
दिल्लीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त करणा-या आणि राज्यात मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्वपूर्ण बैठक होत आहे. दिल्लीत होणा-या बैठकीत शरद पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
Jul 22, 2012, 07:22 PM ISTनिचरा पैशाचा की कचऱ्याचा...
मुंबई महापालिकेनं राबवलेल्या ‘ब्रिमस्टोवॅट’ प्रकल्पाचा खर्च कसा वाढला याबद्दल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिलंय.
Jul 17, 2012, 10:28 AM ISTविधान परिषदेसाठी कोण असतील काँग्रेस उमेदवार?
आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली.
Jul 8, 2012, 12:37 PM ISTमुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार
मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.
Jun 22, 2012, 04:57 PM ISTमंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही
राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे
Jun 22, 2012, 04:27 PM ISTमंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार
मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.
Jun 22, 2012, 04:17 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन
ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.
Jun 22, 2012, 02:36 PM IST