मेट्रो ३ चाही मार्ग मोकळा
मुंबईत मेट्रो - 3 चा मार्ग उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय कॅबीनेट कमिटीने सुमारे 23,000 कोटी रुपयांच्या मेट्रो-3 ला मान्यता दिली आहे. त्यामुळे मेट्रो-1 नंतर मेट्रो-3 मुंबईमध्ये धावतांना बघायला मिळणार आहे.
Jun 28, 2013, 11:34 PM ISTमेट्रो सज्ज!.. १ मे ला चाचणी?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी...... मेट्रो सज्ज झाली आहे. महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाची चाचणी 1 मे रोजी होण्याची शक्यता आहे.
Apr 29, 2013, 10:16 PM ISTदिल्ली मेट्रोला १० वर्ष पूर्ण; मुंबई मात्र लटकलेलीच!
दिल्लीतील सार्वजनिक वाहतुकीचा मानबिंदू ठरलेल्या मेट्रोला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाली. २४ डिसेंबर २००२ रोजी दिल्ली मेट्रो सुरु झाली होती. दिल्ली मेट्रो यशस्वितेचे मैलाचे दगड सर करीत असताना मुंबई मेट्रोला मात्र अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
Dec 25, 2012, 04:13 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचा मार्ग सोपा
पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीत मेट्रो प्रकल्प राबवायला सर्वसाधारण सभेनं मंजुरी दिलीय. पिंपरी-चिंचवड पालिका भवन ते स्वारगेट या मार्गाची लांबी १६ किलोमीटर इतकी आहे. तसंच या मार्गावर एकूण १५ थांबे असतील.
Sep 25, 2012, 02:08 PM ISTमेट्रो रेल्वेचा पूल कोसळला, १ ठार, १३ जखमी
मुंबईतील अंधेरी भागात मेट्रो रेल्वेचा पूल कोसळल्याने झालेल्या अपघातात जवळपास २० जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अंधेरी-कुर्ला रस्त्यावरील हॉटेल लीला आणि मुकुंद नर्सिंग होमच्या दरम्यान ही घटना घडली.
Sep 4, 2012, 05:14 PM IST