युपी निवडणूक

उत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.

Mar 8, 2017, 08:58 AM IST

उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट - अमित शाह

सातव्या टप्प्याच्या मतदानाआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट भाजपच्या बाजूनं असल्याचं अमित शहांनी म्हटलंय.

Mar 7, 2017, 11:47 AM IST

उत्तर प्रदेशातल्या यादवीवर पंतप्रधान मोदींचं टीकास्त्र

समाजवादी पक्षात सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश कुमार आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये जमत नसल्याने पक्ष तुटण्याच्या मार्गावर आला आहे. याबाबतच आज सकाळी मुलायम सिंह यादव यांनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली. 

Oct 24, 2016, 03:59 PM IST

यादवांच्या वादात काँग्रेसनं घेतली उडी

उत्तर प्रदेशातल्या यादवांच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतलीय. अखिलेश सरकारच्या मदताली काँग्रेस धावून आली आहे. उत्तर प्रदेशातलं अखिलेश सरकार संकटात असेल तर मदत करणार असल्याची भूमिका काँग्रेसनं घेतलीय. 

Oct 24, 2016, 03:44 PM IST

समाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायम सिंह यादवांनी केलं मोदींचं कौतूक

लखनऊमध्ये आज समाजवादी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी भाषण देतांना मुख्यमंत्री अखिलेश कुमार यांना सुनावलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं.

Oct 24, 2016, 01:42 PM IST

अखिलेश यादवांनी दाखवली मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची तयारी

समाजवादी पक्ष हा फूट पडण्याच्या मार्गावर दिसत आहे. आजचा दिवस हा समाजवादी पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा दिवस असणार आहे. लखनऊमध्ये याबाबत एक महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. कोणत्याही क्षणी मुलायम सिंह यादव यांच्याकडून मोठा निर्णय घोषित होऊ शकतो.

Oct 24, 2016, 11:31 AM IST

समाजवादी पक्षात महाभारत : मुलायम यादव होणार मुख्यमंत्री ?

समाजवादी पक्षाची पुढची दिशा कशी असणार याचा निर्णय आज होणार आहे. आजचा दिवस समाजवादी पक्षाच्या दृष्टीने मोठा दिवस असणार आहे. पक्षामध्ये आज मुलायम सिंह यादव मोठा निर्णय घेऊ शकतात.

Oct 24, 2016, 11:13 AM IST