उत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.

Updated: Mar 8, 2017, 08:58 AM IST
उत्तर प्रदेशात आज अखेरच्या टप्प्यातलं मतदान title=

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या सातव्या टप्प्यात आज मतदान होतंय. पूर्वकडच्या सात जिल्ह्यांमध्ये 40 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडतेय. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसह सात जिल्हे आहेत.

प्रशासनानं मतदान सुरळीत पार पडावं म्हणून सर्व तयारी पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. प्रचाराच्या या शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षांच्या प्रमुख प्रचारकांनी स्वताला झोकून दिलं होतं. वारणसी या आपल्या मतदारसंघात पंतप्रधान मोदींनीही तिन दिवस तळ ठोकून सभा आणि रोड शो घेऊन झंझावाती प्रचार केला होता. दुसरीकडे मणीपुरमध्येही दुस-या टप्प्यातील 28 जागांसाठी आज मतदान होतंय. मणिपूरमध्ये एकूण 60 जागा आहेत.