वादळी वारा

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तीन दिवसांपासून वादळी वारे वाहू लागलेत. सोसाट्याच्या वा-यामुळे मोठी झाडं उन्मळून पडलीत. त्यातच काही घरांचं देखील नुकसान झालंय. त्यातच काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊसही सुरू आहे. या दोन जिल्ह्यात वीज पडून ठार होण्याचा आकडा आता दहावर गेलाय. परभणीत दोन ठिकाणी वीज पडून 2 ठार 2 जखमी झालेत. सेलू तालुक्यातील नरसापुर येथे एक जण ठार तर मायलेक गंभीररित्या भाजले आहेत. जिंतूर तालुक्यातील गीते पींपरी येथे 38 वर्षीय सूर्यभान मस्केवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय.

Jun 6, 2016, 10:16 AM IST

अवकाळी पावसानं राज्यात घेतले पाच बळी

सलग दुसर्‍या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

Apr 20, 2014, 03:41 PM IST