विजय शिवतारेंची अजित पवारांवर सडकून टीका
एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे अशी शिवसेना दूतोंडी मांडूळ आहे असे आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले होते. त्याच आरोपांना उत्तर देतांना बारामतीत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी भ्रष्टाचाराचा अजगर कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती असून या अजगरामुळेच पूर्ण शेतकऱ्यांची अडचण झाली असल्याचा आरोप करत अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Jul 10, 2017, 09:34 AM ISTकचरा प्रश्नाची कोंडी कायम, राज्यमंत्री शिवतारेंचा प्रयत्न अयशस्वी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 07:28 PM ISTपुण्यातील कचरा प्रश्नाची कोंडी कायम, राज्यमंत्री शिवतारेंचा प्रयत्न अयशस्वी
पालकमंत्री तसेच महापौरांच्या अनुपस्थितीत राज्यमंत्री विजय शिवतारेंनी आज पुण्यातील कचरा कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला. ठरलेल्या मुदतीत कचरा डेपोचा प्रश्न सुटला नाही तर थेट राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र त्याउपरही आंदोलनकर्ते ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. स्वतःच्या तोंडावर पट्टया बांधून त्यांनी माघारीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.
May 6, 2017, 06:51 PM ISTशिवसेनेच्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट हल्लाबोल..
शिवसेनेचे राज्य सरकारमधले मंत्री विजय शिवतारे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केलाय. मंत्रिमंडळात केवळ शिवसेनाच नाही तर भाजपच्या मंत्र्यांनाही विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप शिवतारेंनी केलाय.
Jan 27, 2017, 06:53 PM ISTभाजपचे गिरीश बापट यांना मस्ती आलेय : शिवसेना आमदार शिवतारे
शिवसेनेचे आमदार आणि मंत्री विजय शिवतारे यांनी पालकमंत्री आणि भाजपचे मंत्री गिरीश बापटांवर हल्लाबोल केला.मेट्रोच्या भूमिपूजनाला बोलावले नाही म्हणून जहरी टीका केली आहे. बापट यांना मस्ती आली आहे, असा प्रहार केलाय.
Dec 27, 2016, 09:43 AM IST'सैराट सिनेमाने तरुण पिढीचं वाटोळं केलं'
मराठीत पहिल्यांदा १०० कोटींचा आकडा गाठणाऱ्या सैराट सिनेमावर राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी तोंडसुख घेतलं आहे.
Jun 27, 2016, 05:53 PM IST'छावण्यांचा निर्णय कोणत्या वेड्याने घेतला'
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे, शिवतारे म्हणाले, "राज्य शासनाने चारा छावण्या बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाशी शिवसेना सहमत नाही, हा निर्णय कोणत्या वेड्याने घेतला".
Feb 21, 2016, 06:53 PM IST