उत्तराखंडमधील काँग्रेसचे ९ बंडखोर आमदार अपात्र
काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आलंय. यासंदर्भात नैनीताल हायकोर्टाचा मोठा निर्णय आलाय. हायकोर्टानं या बंडखोर आमदारांची याचिका फेटाळलीय. याचिका फेटाळल्यामुळं हे बंडखोर आमदार मंगळवारी होणा-या विश्वासदर्शक ठरावावेळी मतदानास अपात्र ठरलेत. उत्तराखंडमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. मात्र या विश्वासदर्शक ठरावावेळी 9 बंडखोर आमदार मतदान करु शकणार नाहीत. या बंडखोरांनी विधानसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देत नैनीताल हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टानं ही याचिका फेटाळल्यानं बंडखोरांना मोठा दणका बसलाय. दरम्यान बंडखोरांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.
May 9, 2016, 03:41 PM IST