bengraft

video :...आणि स्मिथ ओक्साबोक्शी रडला

द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसामन्यादरम्यान बंदी घालण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने आज पत्रकार परिषद घेतली. बॉल कुरतडल्याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी त्याने यावेळी घेतली. माझे सर्व सहकारी, क्रिकटचे चाहते आणि सर्व ऑस्ट्रेलियन्सची मी माफी मागतो. आय अॅम सॉरी. मी याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतो, असे स्मिथे यावेळी स्पष्ट केले. 

Mar 29, 2018, 02:41 PM IST

आयपीएलमध्ये नाही खेळणार स्मिथ आणि वॉर्नर

बॉल कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची बंदी घालण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उप कर्णधार डेविड वॉर्नर आयपीएलच्या ११व्या हंगामात खेळणार नाहीयेत. येत्या ७ एप्रिलपासून आयपीएलच्या घमासानाला सुरुवात होतेय. स्मिथ आणि वॉर्नर यांचा सहभाग नसल्याने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स आणि हैदराबाद सनरायजर्स संघाना मात्र मोठा फटका बसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज स्मिथ आणि वॉर्नरबाबत निर्णय़ जाहीर केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये. 

Mar 28, 2018, 02:27 PM IST

बॉल टेंपरिंग : स्मिथ-वॉर्नरवर एका वर्षाची तर बेनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी

द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय जाहीर केलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये. 

Mar 28, 2018, 02:11 PM IST

ऑस्ट्रेलियाने स्वत:चीच उडवली खिल्ली

बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक भूमिका घेत कसोटी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमेरुन बेनक्राफ्ट यांना दोषी ठरवत आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघाबाहेर काढलेय. तर कोच डॅरेन लेहमन यांना क्लीनचिट देण्यात आलीये. बॉल टेंपरिंग प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघावर चहूबाजूंनी टीका होतेय. ही घटना इतकी गंभीर की ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही यात हस्तक्षेप करावा लागला. 

Mar 28, 2018, 12:10 PM IST

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आपातकालीन बैठक, खेळाडू आणि कोचबाबत आज निर्णय

द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी मंगळवारी द. आफ्रिकेत आपातकालीन बैठक होणार आहे. या बैठकीत कोच डॅरेन लेहमन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदलँड यांच्यावर कारवाईसाठी मोठा दबाव आहे. कारण बॉल टेंपरिंग प्रकरणावरुन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सवर चहूबाजूंनी टीका होते. ऑस्ट्रेलियन मीडियाने तर हे प्रकरण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीला काळिमा असल्याचे म्हटलेय. 

Mar 27, 2018, 01:54 PM IST