दिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
दिल्ली हिंसाचार : पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Feb 26, 2020, 11:30 PM ISTरोखठोक । हिंसाचार का?
नवी दिल्लीत सीएएला तीव्र विरोध होत आहे. शांततेत चाललेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दिल्लीतील हिंसाचारात २४ जणांचे बळी गेले आहेत. दरम्यान, हिंसाचाराचे राजकारण कोण करतंय, यावर रोखठोकमध्ये चर्चा हिंसाचार का?
Feb 26, 2020, 08:05 PM ISTनवी दिल्ली । हिंसाचार : अजित डोवाल यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
दिल्लीत मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सीएए वरुन सुरु अललेल्या आंदोलनाने काल अचानक हिंसेचं रुप धारण केलं. ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी आहेत. दिल्ली पोलिसांच्या हातातून परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरु होता. पण ती हाताळली गेली नाही. त्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर अजित डोवाल हे स्वतः दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले आहेत.
Feb 26, 2020, 08:00 PM ISTनवी दिल्ली । अजित डोवाल यांची नागररिकांशी चर्चा, दिला धीर
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या आधी जाफराबाद, सीलमपूर सह नॉर्थ-ईस्ट दिल्लीच्या अनेक भागांचा दौरा केला. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम परिसर भागात पाहणी करत शांततेचे आवाहन केले. तेथील नागररिकांशी चर्चाही केली आणि त्यांना धीर दिला.
Feb 26, 2020, 07:40 PM IST