डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : तर तपास सीबीआयकडे - मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी अन्य तपास यंत्रणांची मदत घेतली जाते. या प्रकरणात गरज पडली तर सीबीआयकडेही हे प्रकरण सोपवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. या प्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Sep 7, 2013, 09:00 AM ISTदाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडं द्या - मुंडे
पुण्यात सर्वात जास्त गुन्हेगारी आहे. चांगल्या IPS अधिका-यांना पुण्यात पोस्टिंग दिलं जात नाही, असा आरोप भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडं द्यावा. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची उकल होणं अशक्य आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.
Sep 3, 2013, 08:56 AM IST