Viral Video: चांद्रयान-3 चंद्राकडे झेपावताना प्रवाशाने विमानातून काढला व्हिडीओ; अंगावर काटा येईल
शुक्रवारी चांद्रयान-3 (Chandrayan 3) अवकाशात झेपावलं आणि अनेक भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’च्या (ISRO) महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण देशवासियांच्या नजरा होत्या. दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी ‘एलव्हीएम३-एम४’ प्रक्षेपणयान चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि भारतीयांनी एकच जल्लोष सुरु केला. श्रीहरीकोटा येथे हे प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसंच शाळांनीही प्रक्षेपणाची व्यवस्था केली होती.
Jul 16, 2023, 12:18 PM IST