congress

मुंबई काँग्रेसमधील गटबाजीचे ग्रहण सुटेना

"सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही" ही म्हण सध्या मुंबई काँग्रेसला तंतोतंत लागू होते. 1985 साली मुंबई काँग्रेसची स्थापना झाली, त्याच मुंबईत आज काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी मुंबईवर याच काँग्रेसने राज्य केले. काँग्रेसने मुंबईला अनेक महापौर दिले. मात्र मागील 20 वर्ष काँग्रेसची मुंबईत सत्तेत येऊ शकलेला नाही आणि काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष बघता या निवडणुकीतही येण्याची शक्यता दिसत नाही. 

Feb 6, 2017, 05:08 PM IST

मुलायमसिंह आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात

समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सध्या केवळ मार्गदर्शक म्हणून उरलेल्या मुलायमसिंह यादव यांनी अखेर पुत्र अखिलेश यादवांसमोर गुडघे टेकले आहेत. 

Feb 6, 2017, 12:48 PM IST

'शिवसेना-काँग्रेसमध्ये मॅच फिक्सिंग'

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसनं 42 प्रभागांमध्ये मॅच फिक्सिंग केलं आहे, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. शिवसेना-काँग्रेसनं भाजपला टक्कर देण्यासाठी मॅच फिक्सिंग केल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत.

Feb 5, 2017, 07:53 PM IST

पुण्यात भाजप-काँग्रेस उमेदवारांच्या उमेदवारीवरुन तिढा

भाजपच्या बुहुचर्चीत उमेदवार रेश्मा भोसले आणि तसेच काँग्रेसचे बहुचर्ती उमेदवार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांना एबीफॉर्म देण्यात आल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. 

Feb 4, 2017, 08:26 PM IST

प्रतीक्षा घुगेंचा एकाच दिवसांत तीन पक्षांमध्ये प्रवास

महापालिकेच्या तिकिटासाठी सर्वच पक्षांमध्ये आयाराम-गयारामचा सुळसुळाट होता. मात्र घाटकोपरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी मात्र पक्षांतराचा वेगळाच विक्रम नोंदलाय. 

Feb 4, 2017, 03:59 PM IST

काँग्रेसला धक्का, एस.एम.कृष्णा भाजपमध्ये जाणार

कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.एम.कृष्णा भाजपच्या वाटेवर आहेत.

Feb 4, 2017, 01:29 PM IST

महापालिका निवडणुकीत या जोडप्यांना उमेदवारी

मुंबईत वर्षानुवर्षांच्या निष्ठेचं फळ मिळेल या आशेनं तिकिटांची प्रतीक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एकीकडे अपेक्षाभंग झाला तर दुसरीकडे काही जोडप्यांना तिकिटाची लॉटरी लागली. 

Feb 4, 2017, 10:03 AM IST

'निवडणूक होऊ दे... मग बघतो'

निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांचा माज दाखवणाऱ्या या बातमीमुळे कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो... किंवा तुम्हाला तुमचा राग अनावरही होऊ शकतो.  

Feb 3, 2017, 03:55 PM IST

ना-ना म्हणत अखेर पुण्यात होणार आघाडी...

पुणे महापालिका निवडणुकीत आघाडीचा पेच अखेर सुटलाय. आज झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली. 

Feb 2, 2017, 09:52 PM IST

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, कामत-निरुपम यांचे कार्यकर्ते भिडलेत

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ज्येष्ठ नेते गुरुदास कामत आणि काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम कार्यकर्ते भिडलेत. त्यामुळे काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा पुढे आलेय.

Feb 2, 2017, 05:59 PM IST