councilors

डोक्यावर फेटे मिरविलेत, चक्क पालिकेला ७७ हजारांचा भुर्दंड

एखाद्याला टोपी घालणे, हा वाकप्रचार आपण नक्कीच ऐकला असेल. पण आता `एखाद्याला फेटा बांधणं` हा वाक्प्रचार देखील त्याच अर्थानं वापरता येईल. त्याचं श्रेय पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना द्यावं लागेल. सभागृहाच्या उद्घाटनासाठी भाड्यानं आणलेले फेटे या मान्यवरांनी गहाळ केलेत. आणि त्याचा भुर्दंड म्हणून ७७ हजार रुपयांच्या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिलीय.

Jun 14, 2014, 01:26 PM IST

शीतल म्हात्रे प्रकरणी पालिकेत हंगामा, पाच नगरसेवक निलंबित

शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई महापालिकेत शिवसेनेची कोंडी विरोधकांनी केली. विरोधकांच्या गोंधळात सभागृह तिसर्‍यांदा गुंडाळले गेले. यावेळी विरोधकांनी गटनेत्यांच्या बैठकीवर बहिष्कार घातला. गोंधळ घातल्याने विरोधी पक्षाच्या पाच सदस्यांवर निलंबनाची कारवाई करीत महापौर सुनील प्रभू यांनी मनमानी कारभार सुरू ठेवला. तसा आरोप विरोधकांनी केलाय.

Jan 22, 2014, 07:38 AM IST