नोटबंदीचा आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम
नोटाबंदीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेली झळ आणखी काही महिने विकासाच्या गतीवर परिणाम करेल असं भाकित स्टेट बँकेनं वर्तवलं आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधानांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीचा दीर्घकालीन परिणाम आत्ताच सांगता येणं कठीण आहे. पण येत्या काही महिन्यात मात्र अर्थव्यवस्था शैथिल्य कायम राहिल असं बँकेच्या एका माहितीपत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.
Jun 12, 2017, 03:38 PM IST