doctor strike

...तर डॉक्टरांविरोधात अवमान याचिका करणार दाखल

राज्यभरातले निवासी डॉक्टर आज कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळं त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी ऍड. दत्ता माने यांनी केलीय. सकाळी अकरा वाजता मुंबई उच्च न्यायालयात ते अवमान याचिका दाखल करणार आहेत. काल झालेल्या सुनावणीवेळी निवासी डॉक्टरांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.

Mar 24, 2017, 10:32 AM IST

डॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..

डॉक्टरांच्या संपामुळे राज्यभरात रुग्णांचे अतोनात हाल होतायत... मुंबईतल्या सायन, केईएमसह सर्वच रुग्णालयांमध्ये काम ठप्प आहे. सायन रुग्णालयात उपचाराआभावी एका 11 वर्षांच्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागलेत. शस्त्रक्रीया रद्द झाल्यामुळे रुग्णांचा जीव मेटाकुटीला आलाय... 

Mar 23, 2017, 06:54 PM IST

डॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..

डॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..

Mar 23, 2017, 05:15 PM IST

मार्डनं पुकारलेला संप घेतला मागे

मार्डने शुक्रवारी पुकारलेला संप मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांना संप करण्याचा अधिकार नसल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एका सुनावणी दरम्यान दिला होता. त्या आदेशानुसार अखेर मार्डने आपला उद्याचा संप मागे घेतलाय. 

Mar 16, 2017, 11:18 PM IST

देशातील खासगी डॉक्टर संपावर

देशातील खासगी डॉक्टर आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहे. खासगी डॉक्टरांच्या देशव्यापी संपात पुण्यातील डॉक्टर्स देखील सहभागी झाले आहे . पुणे इंडियन डिकल असोसिएशननं मोर्चा काढून संपला पाठींबा दर्शवला.

Jun 25, 2012, 01:24 PM IST

रूग्णालयात मारहाण, डॉक्टर अघोषित संपावर

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं अघोषित संप पुकारला आहे. संपामुळं रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Apr 23, 2012, 03:39 PM IST