fabric

आता चार्जरची डोकेदुखी संपणार; कधीही आणि कुठेही असा चार्ज करा तुमचा 'स्मार्टफोन'

ऐनवेळी चार्जिंग पॉईंट न मिळाल्याने अनेकदा पंचायत होते पण आता तसं होणार नाही 

Oct 26, 2022, 11:24 AM IST

फॅब्रिक, सर्जिकल आणि डबल मास्क कुठे? कधी? कोणी वापरावा? WHOच्या गाईडलान्स वाचा

सर्जिकल मास्क, फॅब्रिक मास्क सोबतच आता डबल मास्क बाबत अनेक मतं तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत.

Apr 25, 2021, 09:27 AM IST

पारदर्शक अजेंडा - एक बनाव

शिवसेना-भाजपमध्ये युतीवरून चर्चा सुरू झाली खरी पण भाजपने या चर्चेत शिवसेनेला कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली असून शिवसेना या व्यूहरचनेत अडकल्याचे चित्र आहे. शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती करण्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले. मात्र हे संकेत देताना त्यांनी कधी नव्हे तो “पारदर्शक अजेंडा” हा शब्द समोर आणला. कुठल्याही पक्षांची युती अथवा आघाडीची चर्चा होते ती जागा वाटपावरून आणि असला मुद्दा तर तो किमान समान कार्यक्रमाचा असतो. या किमान समान कार्यक्रमामध्ये निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन सामोरं जायचं, जनतेला कोणती आश्वासने द्यायची अथवा सत्ता आल्यानंतर कोणती कामे करायची याचा प्रामुख्याने असला तर समावेश असतो. पण भाजपाने कधी नव्हे ते युती करताना पहिली अट टाकली आहे ती पारदर्शक अजेंड्याची. ही अट टाकूनच भाजपाने शिवसेनेची मोठी कोंडी केली आहे. प्रथमतः पारदर्शक अजेंडा म्हणजे काय याची फोड भाजपाने केलेली नाही. शिवसेनेनेही पारदर्शक अजेंडेचा वेगळा अर्थ काय असा सवाल उपस्थित केल्याने भाजपाने शिवसेनेसमोरही त्याची फोड केलेली दिसत नाही.

Jan 30, 2017, 11:19 AM IST