good news for ritika shrotri

मराठमोळी अभिनेत्री रितिका श्रोत्रीची 'भारत रंग महोत्सव'मध्ये बाजी

कलाकार असाच घडत नाही. त्यामागे असलेली कलाकारांची मेहनत ही त्या कलाकाराला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते. आजवर सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाची आवड जोपासत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री. रितिकाला आजवर आपण अनेक चित्रपटात काम करताना पाहिलंच आहे. पण तिच्या रंगमंचावरील प्रवासाबाबत फार कमी जणांना ठाऊक असेल. या प्रवासाबाबत रितिका म्हणाली, "वयाच्या सहाव्या वर्षांपासून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. मला अस वाटतं नाटकात काम करुन खऱ्या अर्थाने एखादा अभिनेता तयार होतो. कारण इथे काम करताना  प्रत्येक प्रयोग नवा असतो".

Mar 18, 2024, 07:25 PM IST