gujrat

व्हिडिओ : चित्त विचलित करणारा भीषण अपघात

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील एक भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. एका पान टपरीसमोर दोन तरुण बसले होते. त्या वेळी काही कळण्याचा आत समोरुन भरधाव वेगाने एक गाडी आली आणि अक्षरक्ष: त्यांच्या अंगावरून गेली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मात्र गाडी झाडावर आदळल्याने तीव्रता कमी झाली. एवढे होऊनदेखील दोघेही तरुण सुदैवाने बचावले आहेत. दोघे तरुण जखमी झाले असून स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Jun 15, 2016, 03:21 PM IST

अर्थशास्त्रात १००, अन्य विषयात मात्र FAIL....

सध्या बोर्डाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. पण एकाच विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून अन्य विषयात विद्यार्थी नापास झाल्याची आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. गुजरात बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेत हा प्रकार घडला आहे. हर्षद सरवय्या या मुलाला बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले मात्र अन्य विषयात हा विद्यार्थी नापास झाला.

Jun 15, 2016, 02:54 PM IST

लग्न करण्याच्या बहाण्याने महिलांनी पुरुषाला लुटले

गुजरात राज्यातील राजकोट येथे लग्न करण्याच्या बहाण्याने एका पन्नास वर्षीय व्यक्तीला चक्क तीन महिलांनी लुटले. याप्रकरणी तीन महिलांसह एकाला अटक करण्यात आलेय.

Jun 10, 2016, 07:48 PM IST

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

May 24, 2016, 10:09 PM IST

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण आणि गुजरातेतील आंबा खरेदी करून परदेशात पाठवण्याचं काम नाशिकच्या शेतकऱ्यांची कंपनी करतेय. गेल्या वर्षी या कंपनीने पाच हजार टन आंबा प्रक्रिया करून गल्फमध्ये पाठवला होता. यावर्षी युरोपासह दहा हजार टन निर्यात अपेक्षित आहे. 

May 24, 2016, 09:01 PM IST

गुजरातपुढे झुकले महाराष्ट्र सरकार

गुजरातपुढे झुकले महाराष्ट्र सरकार

May 24, 2016, 08:12 PM IST

गुजरातपुढे महाराष्ट्र झुकला

गुजरातच्या दबावापुढे झुकत महाराष्ट्रानं नर्मदा खो-यातल्या पाच टीएमसी पाण्यावरचा हक्कच सोडून दिला आहे. यासंदर्भातला गुजरात सरकारला अनुकूल असा करारही देवेंद्र फडणवीस सरकारनं, 7 जानेवारी 2015 रोजी केला आहे. विशेष म्हणजे या कराराला नाशिक पाटबंधारे विभाग आणि तापी सिंचन महामंडळानं विरोध दर्शवला होता. त्याकडेही महाराष्ट्र सरकानं सोईस्कर दुर्लक्ष केल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय.

May 24, 2016, 04:59 PM IST

पूल तुटला, बसमध्येच अडकली

पूल तुटला, बसमध्येच अडकली

May 22, 2016, 11:07 PM IST

आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी ?

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

May 16, 2016, 06:25 PM IST

गुजरातमध्ये १० टक्के आरक्षण, पाटीदार समाज आंदोलनाला यश

पाटीदार नेता हार्दिक पटेल आंदोलनापुढे गुजरात सरकारला अखेर झुकावे लागले. राज्य सरकारने सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी १० टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

Apr 29, 2016, 02:00 PM IST

२ हृदय, ४ कान आणि ४-४ हात-पाय असणारा मुलगा, डॉक्टरही हैराण

 येथील एका हॉस्पिटलमध्ये एका महिलेने दोन हृदय, दोन डोळे, चार कान चार हात आणि चार पायांच्या मुलांना जन्म दिला आहे. 

Apr 27, 2016, 04:18 PM IST