houses in nashik

समाजकंटकांकडून पुन्हा गाड्यांची तोडफोड आणि घरांवर दगडफेक

नाशिकमध्ये पुन्हा समाजकंटकांनी धुमाकूळ घातलाय. नाशिकच्या  पंचवटी परिसरातील सीतागुंफा परिसरात रस्त्यावर  उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडलीय. पहाटेच्या सुमारास अज्ञात टोळक्यांनी काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केलाय. वाहनांच्या काचा फोडल्यानंतर या टोळक्यानं काही नागरिकांच्या घरांवरही दगडफेक केल्याचे स्थानिकांनी सांगितलंय.  परिसरात घडलेल्या या घटनेन नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Jun 29, 2018, 02:39 PM IST