indebtedness

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आळंदीमध्येही बंसीधर गिरे या शेतकऱ्याने सोमवारी आत्महत्या केली. मुळच्या परभणीच्या बन्सीलाल गिरे यांची जमीन सावकाराकडे गहाण होती. कर्जबाजारीपणामुळे ते आळंदीत आले. त्यांच्या मुलाला इथं नोकरी ही लागली. पण सावकारानं फोनवरून कर्जफेडीसाठी तगादा लावला. याला कंटाळून सोमवारी गिरे यांनी आत्महत्या केली.

Apr 12, 2016, 09:21 PM IST