india pak border 0

भारत-पाक सीमेवरुन एका संशयिताला अटक

भारत-पाक सीमेवर राजस्थानमध्ये जैसलमेर येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयिताला अटक केली आहे. या संशयिताची कसून चौकशी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रविवार रात्री सीमा सुरक्षा दलाने पोस्ट आरडी 231 जवळ एका संशयिताला अटक केली. लखवीर खिरास असं त्याचं नाव असल्याचं त्याने सांगितलं आहे.

Aug 14, 2017, 03:27 PM IST