india vs sri lanka

भारताचा श्रीलंकेवर दमदार विजय

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने नऊ विकेट राखत शानदार विजय मिळवलाय. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले २१७ धावांचे आव्हान भारताने एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. 

Aug 20, 2017, 08:41 PM IST

श्रीलंकेविरुद्ध शिखरचे शानदार शतक

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने शानदार शतक साकारलेय. त्याने ७१ चेंडूचा सामना करताना १६ चौकार आणि २ षटकारांसह दमदार शतकी खेळी साकारली.

Aug 20, 2017, 08:15 PM IST

भारतासमोर विजयासाठी २१७ धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा डाव २१६ धावांत आटोपलाय. भारताने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेला पहिल्या वनडेत ५० षटकेही पूर्ण खेळता आली नाही. 

Aug 20, 2017, 05:51 PM IST

धोनीला आहे 'बाहुबली' होण्याची सुवर्णसंधी

आपल्या खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेला धोनी बऱ्याच कालावधीनंतर पुनगागमन करत आहे. एकेकाळी भारतीय संघात सर्वोच्च असलेल्या विश्वविजेत्या या कर्णधाराकडे पुन्हा एकदा 'बाहुबली' होण्याची संधी चालून आली आहे.

Aug 20, 2017, 03:09 PM IST

विराटने केली होती हार्दिकची स्टोक्सशी तुलना, पण गावस्कर...

  श्रीलंका टेस्ट सिरीजद्वारे टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये मिळालेल्या विजयाचा नायक म्हणून विराट कोहलीने हार्दिक पांड्याचे नाव घेतले. 

Aug 16, 2017, 08:53 PM IST

टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा

भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.

Aug 15, 2017, 01:50 PM IST

भारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स

भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली.

Aug 14, 2017, 08:54 PM IST

विराट कोहलीने धोनीला टाकलं मागे

विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने परदेशात आतापर्यंत ७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. धोनीला मागे टाकत दुसऱ्या देशात सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. विराटच्या टीमने दुसऱ्या देशात जाऊन १३ सामने खेळले. ज्यामध्ये ७ सामने जिंकले. 

Aug 14, 2017, 03:44 PM IST

हार्दिक पंड्याचा कँन्डीमध्ये झंझावात

हार्दिक पंड्याचा केन्डीमध्ये झंजावात

Aug 13, 2017, 07:46 PM IST

... नाहीतर रोहित शर्मा असेल भारतीय संघाचा कर्णधार !

 सिरीजनंतर झालेल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ९ विकेटने पराभव झाला. त्यानंतर अमेरिकेत एक शॉर्ट ब्रेक घेऊन विराट श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला. 

Aug 9, 2017, 12:31 PM IST

दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका दोन बाद ५०

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ५० धावा केल्यात. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजंथा मेंडीस १६ तर दिनेश चंडीमल ८ धावांवर नाबाद होते. 

Aug 4, 2017, 05:12 PM IST

हार्दिक पंड्याने व्यक्त केला पहिली टेस्ट खेळण्याचा अनुभव

टेस्ट क्रिकेटमध्ये खेळणे कोणत्याही खेळाडूसाठी दडपणाचं असतं. मात्र टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याचा पहिल्याच टेस्टमधील दमदार खेळ पाहता तो वन डे खेळत असल्याचे दिसले. पंड्याने ४९ बॉल्समध्ये ५० रन्स केलेत ज्यामुळे टीम इंडियाने वेगाने ६०० रन्स जमवलेत.

Aug 2, 2017, 05:07 PM IST

भारताचा श्रीलंकेवर ३०४ रन्सने 'विराट' विजय

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. गॉल इंटरनेशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये पहिला इंनिगमध्ये भारताकडे ३०९ रनची आघाडी होती. दूसऱ्या इनिंगमध्ये भारताने आणखी २४० रन्स जोडत श्रीलंकेसमोर ५५० रन्सचं टार्गेट ठेवलं. 

Jul 29, 2017, 04:59 PM IST

पुजाराने केली सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी

 भारताचा कसोटीवीर फलंदाज चेतेश्वर पुजारा याने गॉल टेस्टमध्ये १२ वे शतक ४९ टेस्टमध्ये पूर्ण केले आहे. ४९ टेस्टमध्ये १२ शतकं करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.  

Jul 28, 2017, 09:11 PM IST