विराटने केली होती हार्दिकची स्टोक्सशी तुलना, पण गावस्कर...

  श्रीलंका टेस्ट सिरीजद्वारे टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये मिळालेल्या विजयाचा नायक म्हणून विराट कोहलीने हार्दिक पांड्याचे नाव घेतले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 16, 2017, 08:53 PM IST
विराटने केली होती हार्दिकची स्टोक्सशी तुलना, पण गावस्कर... title=

नवी दिल्ली :   श्रीलंका टेस्ट सिरीजद्वारे टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये मिळालेल्या विजयाचा नायक म्हणून विराट कोहलीने हार्दिक पांड्याचे नाव घेतले. 

यापूर्वी विराटने हार्दिक पांड्याची तुलना इंग्लंडचा ऑलराउंडर बेन स्टोक्सची केली होती. पण आता पांड्याच्या प्रशंसकांमध्ये सुनील गावस्कर यांचेही नाव जोडले गेले आहे. त्यांनी हार्दिक पांड्याची कामगिरी पाहून त्याची तुलना ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद फलंदाज डेव्हिड वॉर्नरशी केली आहे. 

गावस्कर म्हणाले, पांड्या ज्या पद्धतीने खेळतो आहे. त्याची लय ही ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर सारखी आहे. 

श्रीलंकेच्या अखेरच्या टेस्टमध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून हार्दिक पांड्याची निवड झाली होती. गावस्कर म्हणाले, हार्दिकने स्वतःला टी-२० स्पेशलिस्टपासून तिन्ही फॉरमॅटपर्यंत स्वतःला योग्य रित्या फिट बसवले आहे. तो खूप प्रतिभावंत आहे आणि भविष्यात भारतीय संघात तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली भूमिका बजावू शकतो. मला नक्की खात्री आहे की, तो डेव्हीड वॉर्नरच्या पावलावर पाऊल ठेवण्याची क्षमता राखतो.