पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारसाठी आली वर्ल्ड बँकेतून खुशखबर
यूपी आणि बिहारच्या पोट निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर मोदी सरकारसाठी वर्ल्ड बँकेकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड बँकेकडून बुधवारी सांगण्यात आले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आणि नोटबंदीनंतर खाली गेलेला अर्थव्यवस्थेचा विकास दर आगामी २०१९-२० पर्यंत ७.५ टक्के वाढू शकतो. वर्ल्ड बँकेकडून सांगण्यात आले की, भारताचे देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढ होऊन २०१७-१८ कालावधीत ७.३ टक्के होण्याची शक्यता आहे. तर २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये हा दर ७.५ टक्के होण्याची शक्यता आहे.
Mar 14, 2018, 09:37 PM IST