'निर्धास्त होऊन सुट्टीवर गेले अन्...', CM शिंदेंनी मतदारांवरच फोडलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) एनडीएला (NDA) 400 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असं गृहित धरून आमचे काही मतदार मतदानादरम्यान सुट्टीवर गेले होते असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 7, 2024, 02:20 PM IST
'निर्धास्त होऊन सुट्टीवर गेले अन्...', CM शिंदेंनी मतदारांवरच फोडलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर title=

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) एनडीएला (NDA) अपेक्षित यश मिळालं नाही. महाराष्ट्रातही महायुतीला मोठं अपयश आलं आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली. देशात एनडीएला 293 जागा जिंकता आल्या, तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या. तसंच महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तर दुसरीकडे महायुतीला मात्र फक्त 17 जागाच जिंकता आल्या. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आपला मतदार निर्धास्त होऊन सुट्टीवर गेल्याने आम्हाला मोठा फटका बसल्याचा दावा केला आहे. मुंबईत सत्ताधारी महायुतीच्या मित्रपक्षांच्या संयुक्त मेळाव्यात संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. 

आपले लोक तीन दिवस सुट्ट्या घेऊन गेले, येणार तर मोदीच यावर लोक गाफील राहिले. जर आमचे 60 टक्के मतदार मतदान केंद्रांवर आले असते तर आम्ही 40 जागा सहज जिंकू शकलो असतो असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. फसवणूक एकदाच होते, नेहमीनेहमी नाही, असंही शिंदे यांनी सांगितलं. हा तोटा भविष्यात अधिक धोरणात्मक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित करतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 

विरोधी मतदारांनी मोठ्य तत्परतेने मतदानाचा हक्क बजावला. विरोधी मतदारांचा टक्का जवळपास 80 टक्के होता, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर आम्ही सतर्क झालो आहोत, असेही ते म्हणाले.

“आपले मतदार मतदानाच्या दिवशी सलग तीन दिवस सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेले. पंतप्रधान मोदी 400 पार जागा आणणारच आहेत, असा विचार करून मतदार सुट्टीवर गेले. आपण गाफील राहिलो आणि विरोधकांचे 80 टक्के मतदार ठपाठप मतदान करून गेले. यातून शिकण्यासारखे आहे. आपल्या 80 टक्के नाही तर 60 टक्के मतदारांनीही जर मतदान केले असते तर आपल्या 40 जागा निवडून आल्या असत्या”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मागच्या सरकारमध्ये फक्त फेसबुक आणि वर्क फ्रॉम होम सुरु होते. आपलं फेसबुक लाइव नसतं, तर फेस टू फेस असतं. त्यांच्या काळात सगळं बंद होतं फक्त फेसबुक सुरू होतं
अशी टीका एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली. वैयक्तिक लाभाची कामे आम्ही केली नाहीत. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. पण लोकांच्या आयुष्यचं सोनं करण्याचं काम आम्ही करतोय असा टोलाही त्यांनी लगावला. इतरांच्या बहिणीबद्दल बोलणाऱ्यांना आपल्या भावाबद्दल प्रेम कसं असेल? असाही टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

अर्थसंकल्पातील योजना पाहून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले आहेत. आधी पैशांची तरतूद केली, नियमांचं पालन केले आणि मगच योजना आणल्या. राहुल गांधी म्हणाले खटाखट एक लाख रुपये पैसे देऊ, त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही अशी टीका त्यांनी केली. 

 नाना पटोले यांनी मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. तुम्ही डोक्यावर पडला काय ? बोफोर्सपासून शेणापर्यंत तुम्ही पैसे खाल्लेत. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का ? आता फुलप्रुफ काम करायचं आहे, विरोधकांना संधी द्यायची नाही असं ते म्हणाले.