manipur violence

मणिपूर घटनेवर कुशल बद्रिके संतप्त, म्हणाला, '...त्याने अवतरण्याची गरज आहे'

Kushal Bandrike on Manipur Violence: सध्या देशभरात मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचारामुळे सगळीकडून निषेध व्यक्त केला जातो आहे. या घटनेवर अनेक कलाकारही व्यक्त होताना दिसत आहेत. यावेळी कुशल ब्रदिकेची पोस्ट चर्चेत आहे. 

Jul 22, 2023, 09:26 PM IST

नराधमांना फाशी द्या! मणिपूरची घटना लज्जास्पद, देशातल्या महिला नेत्यांचा संताप

मणिपूरची धग सगळ्या देशभर पसरलीय.... मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार एवढं भयावह होते की अख्खा देश यामुळे अक्षरसः पेटून उठलाय... गल्ली ते दिल्ली मणिपूर घटनेबद्दल संताप व्यक्त केला जातोय.  याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देशभरातून होतेय.

Jul 22, 2023, 05:04 PM IST

'जर तुझ्यात हिंमत असेल तर द मणिपुर फाइल्स बनव...', नेटकऱ्याच्या प्रश्नावर विवेक अग्निहोत्री यांचे सडेतोड उत्तर

Vivek Agnihotri Manipur: विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या द काश्मिर फाइल्समुळे सतत चर्चेत असले तरी देखील आता नेटकरी त्यांच्याकड द मणिपूर फाइल्स हा चित्रपट बनवण्याची मागणी करत आहेत. त्यावर विवेक अग्निहोत्रीनं दिलेलं उत्तर चर्चेत आहे. 

Jul 22, 2023, 10:55 AM IST

'कारगिलमध्ये देश वाचवला, पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही'; मणिपूरमधील 'ती' माजी सैनिकाची पत्नी

Manipur Violence : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या व्हिडीओ बुधवारी समोर आला आहे. ही घटना 4 मे 2023 रोजी घडल्याचे म्हटलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संताची लाट उसळली आहे. अशातच ज्या महिलेसोबत हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय ती एका माजी सैनिकाची पत्नी असल्याचे समोर आले आहे.

Jul 21, 2023, 03:10 PM IST

मणिपूरमध्ये शीर कापून बांबूच्या कुंपणावर ठेवलं, महिलांची नग्न धिंड काढल्यानंतर आणखी एका व्हिडीओमुळे खळबळ

Manipur Viral Video: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना समोर आल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओ कुकी (Kuki) समाजातील एका व्यक्तीचं शीर कापून ठेवण्यात आलं आहे. या व्हिडीओतून मणिपूरमधील हिंसाचार कोणत्या स्तराला पोहोचला आहे, याची कल्पना येत आहे. 

 

Jul 21, 2023, 02:04 PM IST

मणिपूर Video प्रकरण: 'आमच्या समाजाला डाग लावला', म्हणत गावातील महिलांनीच जाळलं आरोपीचं घर

Manipur Viral Video Accused House Set On Fire: हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जमावामधील प्रमुख आरोपीला त्याच्या गावामधून अटक केली आहे. यानंतर गावकरीही संतापले आणि त्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला.

Jul 21, 2023, 01:38 PM IST

मणिपूरनंतर आणखी एक संतापजनक घटना! बंगालमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन फिरवलं, गावात काढली धिंड

Woman paraded naked in Bengal: मणिपूरमधील (Manipur) घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात असताना, पश्चिम बंगालमध्येही (West Bengal) अशीच घटना घडली आहे. हावडा (Howrah) येथील पांचलामधील पंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराने तृणमूलच्या कार्यकर्त्यांना शारिरीक छळ केल्याचा आरोप केला आहे. 

 

Jul 21, 2023, 12:46 PM IST

Manipur: 'त्या' व्हिडीओमधील पीडित तरुणीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली, 'पोलिसांनीच आम्हाला...'

Manipur Women Paraded Incident: व्हिडीओत दिसणाऱ्या पीडितेने त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भातील धक्कादायक खुलासा करताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला असून तिने राज्यातील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Jul 21, 2023, 08:45 AM IST

Manipur: नग्नावस्थेत महिलांची धिंड काढणाऱ्या मुख्य आरोपीला अटक; समोर आली धक्कादायक माहिती

Manipur Women Viral Video Culprit Arrested: 1 हजार लोकांच्या जमावाने गावावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांनी स्वत:चा जीव वाचवून पळणाऱ्या 3 महिलांना पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांचे कपडे काढून नग्नावस्थेत त्यांची धिंड काढली.

Jul 21, 2023, 08:05 AM IST

4 मे रोजी महिलांना विवस्त्र फिरवलं, 49 दिवसांनंतर FIR, 78 दिवसानंतर अटक का? मणिपूरचा संपूर्ण घटनाक्रम

मणिपूरमध्ये 4 मे रोजी कुकी समुदायाच्या दोन महिलांना निर्वस्त्र करत रस्त्यावर फिरवण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. 18 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर 20 जुलैला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पहिली अटक झाली. 

Jul 20, 2023, 07:00 PM IST

'तुमच्याकडे फार कमी वेळ आहे,' मणिपूर प्रकरणी सरन्यायाधीशांचा संताप; सरकारला दिला इशारा

Supreme Court on Manipur: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती देण्यास सांगितलं आहे. जर सरकारने काही पाऊल उचललं नाही, तर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उचलेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

 

Jul 20, 2023, 02:17 PM IST

मणिपूरच्या दोन महिलांना निर्वस्त्र करत सामूहिक अत्याचार प्रकरणी अक्षय कुमार संतापत म्हणाला, व्हिडीओ पाहून...

Akshay Kumar Video : मणिपूरमध्ये घडलेल्या विचित्र प्रकरणानं संपूर्ण देश हादरला आहे. त्या व्हिडीओवर आता फक्त नेटकरी नाही तर सेलिब्रिटींपासून सगळेच संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. आता अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री रिचा चड्ढा, उर्मिला मातोंडकर आणि रेणुका शहाणे यांनी देखील पोस्ट शेअर केल्या आहेत. 

Jul 20, 2023, 11:16 AM IST

"कोणालाच सोडणार नाही"; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा

PM Modi On Manipur Violence Viral Video: 2 महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवल्याच्या घटनेवर बोलताना पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त केला आहे. कोणालाही सोडणार नाही असं सांगतानाच पंतप्रधानांनी देशातील सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना एक आवाहनही केलं आहे.

Jul 20, 2023, 11:06 AM IST