milk

आईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान!

आईचं दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान असतात, असा अभ्यास ब्राझीलमध्ये झाला आहे. समाजाच्या सर्व स्तरातील ३५०० मुलांचा अभ्यास करण्यात आला असून, त्याचा हा निष्कर्ष आहे. हे निष्कर्ष अद्याप निर्णायक नाहीत, पण सध्या मुलांना किमान सहा महिने स्वत:चे दूध पाजा असा सल्ला डॉक्टर देतात, त्याच्याशी हा निष्कर्ष निगडित आहे.

Mar 19, 2015, 09:19 PM IST

सावधान! हिरव्या भाज्या खाल्ल्यानं होऊ शकतो कँसर

हिरव्या भाज्या आणि दूध आरोग्यासाठी चांगलं असतं हा आपला समज आहे, पण हे आता खात्रीलायक राहिलं नाही. शहरात विकले जाणारे हे पदार्थ आता कीटकनाशकांच्या साइड इफेक्ट्सचे बळी ठरत आहेत.

Mar 15, 2015, 02:19 PM IST

बाबा रामपालने अंघोळ केलेल्या दुधाची बनायची खीर

 बाबा रामपालच्या जाळ्यात कशा पद्धतीने लोक अडकले होते, ते आता हळूहळू समोर येत आहे. बाबाच्या खोट्या महिमेच्या आहारी गेलेल्या लोकांनी सांगितले की, बाबाला ज्या दुधाने अंघोळ घातली जायची त्या दुधाची नंतर खीर बनवली जायची. 

Nov 20, 2014, 09:00 PM IST

हळद टाकून दूध घेण्याचे अनेक फायदे

दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. तर हळदीत अॅंटीबायोटीक असते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे लाभ दुहेरी होतात.

Aug 27, 2014, 03:49 PM IST

अमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा ठाणे जिल्ह्यात विरारमध्ये पर्दाफाश झालाय. एक लिटर दुधाच्या पाकिटातून पन्नास मिलीलीटर दूध बाहेर काढलं जायचं. त्यात तेवढंच नळाचं पाणी भरुन भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री होत होती. 

Jul 21, 2014, 10:40 PM IST

राज्यात पुन्हा दूध २ रूपयांनी महागले

महिन्याभरात दुधाच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गायीच्या आणि म्हशीच्या दुधात लीटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात ही दरवाढ लागू असेल असं दूध उत्पादक संघानं स्पष्ट केल आहे.

Dec 18, 2013, 08:55 PM IST

गोरेपणाचा मोह सोडा, तुम्ही सावळेच बरे!

तुम्ही सावळे असाल तर मग चांगलीच गोष्ट आहे, हे आम्ही नाही सांगत तर वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे. वैद्यकीयदृष्ट्या सर्वात निरोगी त्वचा ही गव्हाळ किवा सावळ्या रंगाच्या व्यक्तीची असते. कारण यात मॅलनीन या रंगाद्रव्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे सूर्यप्रकाशात अतिनील किरणांपासून संरक्षणही होते. जर तुम्ही सावळे असाल तर उत्तम आहे.

Dec 7, 2013, 03:05 PM IST

राज्यात पुन्हा एकदा दूध महागलं

राज्यात पुन्हा एकदा दूध महागलं आहे. गाय आणि म्हैशीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लिटरमागे आता दोन रूपये जादा मोजावे लागणार आहेत.

Nov 22, 2013, 11:21 PM IST

दुधाचे दर ३ रुपयांनी वाढणार!

गेल्या महिन्यात सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे जनता खुश झाली होती. तसंच पेट्रोलचे भावही कमी झाल्याचंही समाधानही जनतेला मिळालं होतं. मात्र दुष्काळामुळे आता दुधाचे दर वाढणार आहेत.

May 5, 2013, 07:12 PM IST

पाण्यानंतर आता दुधाची टंचाई!

सांगली जिल्ह्यातील तीव्र दुष्काळाचा परिणाम पशुधनावर झाला आहे. चारा छावण्यांमुळे पशुधन काही प्रमाणात तगले असले, तरी दुध संकलनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील दुध संकलन तीन महिन्यात एक लाख लिटरने घटले आहे. मागील एका महिन्यातच 50 हजार लिटरनं दुध संकलन कमी झालं आहे.

Mar 24, 2013, 05:02 PM IST