more job opportunity

देशात नोकरीच्या सर्वाधिक संधी देणारी महाराष्ट्रातील २ शहरं

राज्याची सांस्कृतीक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याला आता आणखी एक ओळख मिळाली आहे. नोकरीच्या संधी निर्माण करण्यात पुणे देशात सहाव्या स्थानावर आहे. ३ महिन्यात पुण्यात ४९ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. नोकरीच्या एकूण संधींमध्ये सहा टक्के वाटा हा पुण्याचा असल्याचा द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज ऑफ इंडिया संघटनेने सांगितले आहे. तीन महिन्यात देशात साडे आठ लाख संधी निर्माण झाल्या होत्या. देशातील नोकरीच्या संधी निर्माण करणाऱ्या शहरांमध्ये पुणे सहाव्या स्थानावर आहे.

Jun 14, 2016, 11:47 AM IST