राज्यात २१ फेब्रुवारी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर
मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २१ फेब्रुवारी मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
Feb 9, 2017, 10:55 PM ISTभाजपने देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली : उद्धव ठाकरे
शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. संसदेत मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली होती. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला. काल मोदींनी मनमोहन सिंग यांनी रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला प्राप्त झाली असं म्हणाले. ते रेनकोट घालून आंघोळ तरी करतात मात्र तुम्ही तर देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली. केवळ साबणाचे बुडबुडे काढलेत. कारण ते पारदर्शक असतात.
Feb 9, 2017, 09:19 PM IST'काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांच्या कामाचे श्रेय भाजपचे'
जे काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, तेच भाजपवाले काँग्रेसच्या मेट्रोचे श्रेय लाटण्याचे काम करत आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.
Feb 8, 2017, 10:46 PM ISTमुंबई पालिका निवडणूक; शिवसेना-भाजपचे धर्मयुद्ध पेटले
करो या मरो या इराद्यानंच शिवसेना आणि भाजप मुंबई महापालिकेच्या रणमैदानात उतरले आहेत. शिवसेनेने थेट भाजपच्या सेनापतींनाच आव्हान दिले आहे. येत्या काळात हा सामना आणखी रंगतदार होणार आहे.
Feb 7, 2017, 11:44 PM ISTठाणे पालिकेच्या निवडणुकीत ८०५ उमेदवार रिंगणात, २२८ जणांची माघार
महापालिकेच्या निवडणुकीत ३३ प्रभागांसाठी १३१ जागांसाठी १०८८ अर्ज दाखल झाले आहेत. ५५ अर्ज अवैध असून २२८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. तर ८०५ उमेदवार रिंगणात आहेत.
Feb 7, 2017, 09:10 PM ISTशिवसेनेपुढे मोठे आव्हान, २१ अमराठी तर १५ आयात उमेदवारांना उमेदवारी
पालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे अशी थेट लढत होणार आहे. तसेच काही ठिकाणी एमआयएमनेही आव्हान निर्माण केले आहे. तर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांना आव्हान आहे.
Feb 4, 2017, 05:23 PM ISTमुंबईत निवडणुकीची चुरस वाढली, प्रचार साहित्य खरेदीची लगबग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 10:10 PM ISTशिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी भरला अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 10:07 PM ISTशिवसेनेचा नाना आंबोलेंना राणे, राज ठाकरेंचा दाखला
शिवसेना बंडखोरी थोपविण्यात यशस्वी होईल, असा दावा करताना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपमध्ये दाखल झालेल्या नाना आंबोलेंना जोरदार टोला लगावलाय. जे सेनेतून बाहेर गेलेत, त्यांचे काय होते, हे राणे, राज ठाकरेंवरुन लक्षात घ्या, असा दाखला दिला.
Feb 3, 2017, 08:10 PM ISTशिवसेना नेतृत्वाची कसोटी, अनेकांची समजूत तर काहींची बंडखोरी
मुंबई पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने शिवसेनेपुढे तिकिट कोणाला द्यायचा याचा पेच निर्माण झाला. शिवसेना नेतृत्वाने काहींची समजूत काढण्यात यश मिळवले. तर काहींना तिकिट न मिळ्याल्याने अधिकृत उमेवारांविरोधात दंड थोपटत बंडखोरी केली आहे.
Feb 3, 2017, 07:30 PM ISTभाजपची नाशिकमधील उमेदवारांची यादी नाहीच!
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस असतानाही नाशिकमध्ये भाजप उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी भाजप जाहीर करणार नाही.
Feb 2, 2017, 09:54 PM ISTशिवसेनेची दक्षिण मुंबईतील उमेदवार यादी जाहीर
आता शिवसेनेने दक्षिण मुंबई शिवसेना उमेदवार यादी जाहीर केली आहे.
Feb 2, 2017, 08:21 PM ISTभाजपला टक्कर देण्यासाठी मुलुंडमध्ये शिवसेनेची खेळी
मुलुंडमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप असा संघर्ष होणार आहे. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. मात्र, खासदार किरीट सोमय्या यांनी शह देण्यासाठी शिवसेनेने गुजराती कार्डचा वापर केलाय.
Feb 2, 2017, 05:37 PM ISTराष्ट्रवादीचा जाहीरनामा जाहीर, मुंबईकरांना देणार मोफत पाणी
महापालिका निवडणुकीसाठी आता रंगत आली आहे. सर्वच पक्षात नाराजी असल्याने इकडून तिकडे उड्या मारण्याचे उद्योग सुरु झाले आहेत. सर्वात आधी शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला. आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केलाय. यात मुंबईकरांसाठी 700 लिटर मोफत पाणी देण्याची घोषणा मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे.
Feb 2, 2017, 05:05 PM ISTशिवसेना-भाजप युतीच्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता आहे. कारण भाजप नेत्यांवरील नाराजी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे व्यक्त करण्यात आली आहे.
Jan 20, 2017, 09:05 AM IST