Ratnagiri Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग, 19 प्रवासी थोडक्यात बचावले
Mumabi-Goa Highway Bus Fire : रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने गेलेल्या खाजगी बसने महाड जवळच्या सावित्री पुलाजवळ पेट घेतला. ही घटना महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर घडली आहे.
Feb 7, 2024, 10:21 AM ISTVideo| तुमच्या घरी येणारं तूप भेसळयुक्त?
The ghee that comes into your home is adulterated
गौरी गणपतीमध्ये विविध पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पती तूप वापरणार असाल तर सावधान... कारण मानवी आरोग्यास धोकादायक वनस्पती तुपाची विक्री करणारी टोळी पकडलीय. अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केलीय. घाऊक व्यापा-यांकडून एकूण 7 लाख 38 हजारांचं तूप जप्त करण्यात आलंय. बेकरीची नियमित तपासणी करताना त्याठिकाणी वापरण्यात येणा-या वनस्पती तुपाचे नमुने घेण्यात आले. त्याची पुण्यातल्या राज्य आरोग्य प्रयोगशाळेत त्याची तपासणी झाली. त्यातून हे वनस्पती तूप मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचं ठळकपणे नमूद करण्यात आलं.
Video| नागरिकांनो सतर्क रहा! राज्यात तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता
Heavy rain will fall in the state for the next three days
Aug 20, 2022, 07:45 AM ISTVideo| मुंबईकरांच्या सेवेसाठी आली बेस्टची डबल डेकर एसी बस
Mumbai Electric AC Double Decker Bus Launched In Presence Of Union Minister Nitin Gadkari
मुंबईत इलेक्ट्रीक एसी डबल डेकर बसचं युग अवतरतंय. बेस्टच्या ताफ्यात पहिली बस दाखल झालीय. आज ही बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत बसचं लॉन्चिंग झालं. एसी डबलडेकर बसचं भाडं कमीत कमी 6 रूपये असणार आहे. पहिल्या 5 किमीसाठी 6 रूपये भाडं आकारलं जाईल. सीएसएमटी ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी, कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गांवर सुरूवातीला या बसेस धावतील. या बसेसमध्ये दोन जिने असतील. डिजिटल टिकिटींग, सीसीटीव्ही अशा सुविधा या एसी डबलडेकरमध्ये असणार आहेत.
Video| सत्तेतलं राजकारण खड्ड्यांना कारणीभूत- बच्चू कडू
Bacchu Kadu Targets Shinde Fadnavis Govt For Poor Road Conditions
खड्ड्यांवरून बच्चू कडूंनी सरकारवरच निशाणा साधलाय...सत्तेमधलं राजकारण खड्ड्यांना कारणीभूत असून ज्या भागातला मंत्री त्याभागतच फक्त काम होतंय असं बच्चू कडूंनी म्हटलंय...सत्तेकडे विकास सुरू असून, गरज तिकडे खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधलाय...
Video| बँकेत ठेवलेलं सोनं झालं ड्युपलिकेट! अमरावतीत घडला प्रकार
How the real gold kept in the bank turned out to be fake
अतिशय धक्कादायक बातमी अमरावतीमधून.... ग्राहकांनी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं सोनं लंपास करुन त्याजागी खोटं सोनं ठेवण्यात आलंय. ५९ ग्राहकांनी बँकेत ठेवलेलं ५ किलो ८०० ग्रॅम खरं सोनं हडप होऊन त्याजागी डुप्लिकेट सोनं समोर आल्याचा धक्कादायक प्रकार युनियन बँकेच्या राजपेठ शाखेत घडलाय. युनियन बँकेच्या वरिष्ठांनी दिलेल्या अहवालातून हा प्रकार समोर आलाय. बँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकांच्या खऱ्या सोन्याशी छेडछाड करण्यात आलीय आणि त्याजागी खोटं सोनं ठेवण्यात आलंय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Video| भुजबळ म्हणाले, "दाढीला चांगले दिवस" फडणवीस म्हणाले, "पांढऱ्या दाढीला मान"
DCM Devendra Fadnavis Revert To Chhagan Bhujbal Remark On Types Of Beard
- विधानसभेत छगन भुजबळ - फडणवीसांची टोलेबाजी
- दाढीला दिवस चांगले आहेत - छगन भुजबळ
- राज्यात काळ्या दाढीचं तर देशात पांढ-या दाढीचं वजन
- तर फडणवीसांचं भुजबळांना प्रत्युत्तर
- आमच्याकडे पांढ-या दाढीला मान - फडणवीस
Video | ठाण्यात दहीहंडीसाठी 2 कोटीची बक्षीसं! कोण चाखणार 2 कोटीचं लोणी
Thane Dahi Handi Almost 2 Crore Prizes To Be Distributed
दहा थरांच्या विश्वविक्रमास 21 लाख, 9 थरांसाठी 11 लाख, 8 थरांसाठी 11 लाख, 8 थरांसाठी 51 हजार अशी लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या रकमांची चढाओढ ठाणे शहरात पुन्हा सरू झालीय. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना निर्बंधांमुळे आणि त्या अगोदर दहीहंडीवरील न्यायालयीन प्रक्रियेमुळे उत्सवातील लाख मोलाच्या बक्षिसांची घागर उताणी झाली होती. परंतु यंदा होणारी महापालिका निवडणूक आणि दोन वर्षांनंतर कोरोनाच्या निर्बंधांतून मुक्त झाल्यामुळे ठाण्यातील आयोजकांकडून लाखोंच्या दहिहंड्या उभारण्यात आल्याय. गोविंदांसाठी दोन कोटीहून अधिक रकमेचे लोणी उपलब्ध करुन दिलंय.
Video | पालघरमध्ये जुळ्या मुलांचा मृत्यू! अजित पवार म्हणाले, "ही घटना लाजिरवाणी"
Opposition Leader Ajit Pawar Question Palghar Twins Passed Away CM Reply
Aug 18, 2022, 05:50 PM ISTVideo | AK-47 सापडलेली बोट ओमानची; सुत्रांची माहिती
The suspicious boat is reported to be from Oman
Aug 18, 2022, 05:40 PM ISTVideo| रायगडमध्ये संशयास्पद बोट! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बोटीची सविस्तर माहिती
DCM Devendra Fadnavis Order On Suspicious Boat Found In Raigad
रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या किना-यावर शस्त्रसाठ्यानं भरलेली बोट सापडल्यानं खळबळ उडालीय. या संशयित बोटीत तीन AK-47 रायफल्स आणि काही काडतुसं सापडली आहेत. त्यानंतर राज्यभर हायअलर्ट घोषित करण्यात आलाय. सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही बोट भरकटून रायगड किना-यावर आली असल्याचं निवेदन दिलंय. भारतीय तटरक्षक दलाकडून या बोटीची माहिती घेण्यात आली असून ती ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची आहे. ही बोट ऑस्ट्रेलियातून युरोपकडे जात होती. मात्र भरकटल्यामुळे ती हरिहरेश्वर किनारी आली. दहशतवाद विरोधी पथकाकडून या बोटीचा तपास केला जात असल्याची माहितीही गृहमंत्री फडणवीसांनी दिलीय.
Video| हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट! बोटीत हत्यारं सापडली?
Suspicious Boat Found In Raigad Harihareshwar Shore
- रायगड जिल्ह्यात संशयास्पद बोट
- बोटीत 4 एके 47 असल्याची स्थानिकांची माहिती
- संशयास्पद बोटीत शस्त्र सापडलं-सूत्र
- रायगड जिल्ह्यात नाकाबंदी, हायअलर्ट
- हरिहरेश्वर च्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट...
- बोट मधून शस्त्र सापडल्याची माहिती...
Video| अजय चौधरी म्हणाले, "खाली बसा" शेलार म्हणाले "तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही"
Argument between Ajay Chaudhary and Ashish Shelar in Vidhan Bhavan
आशिष शेलार आणि अजय चौधरी यांची आज विधानसभेत चांगलीच खडाजंगी झाली. एका मुद्द्यावर शेलार बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री झाली. त्यावर ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी शेलारांना खाली बसायला सांगितलं. त्यावर शेलारांनी मला तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर दिलं
Video| मुंबई गोवा हायवे कधी होणार पूर्ण? ऐका रविंद्र चव्हाण काय म्हणाले
Ravindra Chavan's promise that the Mumbai Goa Highway will be completed by December 2023
मुंबई गोवा महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलंय. मुंबई गोवा हायवेच्या दूरवस्थेवरून विधानसभेत घमासान चर्चा झाली. आमदार सुनील प्रभूंनी या संदर्भात लक्षवेधी मांडली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्टपर्यंत रस्त्यातील खड्डे बुजवले जातील. 26 ऑगस्टला आपण स्वतः इथे भेट देऊ असं सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हटलंय.
Video | महापुरुषांच्या फोटोच्या जागी भाजप नेत्यांचे फोटो; कोल्हापुरात शिवसेना आक्रमक
Shiv Sainik aggressive for photos of Nationa Great Leaders in Kolhapur
Aug 18, 2022, 11:50 AM IST