paralyses

डॉक्टरांच्या संपाचा राज्यात पहिला बळी

डॉक्टरांच्या संपाचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये गेलाय. रावेरच्या सरदार जी. जी. हायस्कूलमधील शिपाई कल्पेश महाजन विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत. वैद्यकीय अधिकारी बी. बी. बारेला हजर नसल्याने संतप्त जमावाने रुग्णालयाच्या दिशेन जोरदार दगडफेक केली तसेच साहित्याची तोडफोड केलीय. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरूच होता. यामुळे रावेर मधील वातावरण तणावपूर्ण झालं होत. या प्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jul 3, 2014, 08:15 PM IST