डॉक्टरांच्या संपाचा राज्यात पहिला बळी

डॉक्टरांच्या संपाचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये गेलाय. रावेरच्या सरदार जी. जी. हायस्कूलमधील शिपाई कल्पेश महाजन विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत. वैद्यकीय अधिकारी बी. बी. बारेला हजर नसल्याने संतप्त जमावाने रुग्णालयाच्या दिशेन जोरदार दगडफेक केली तसेच साहित्याची तोडफोड केलीय. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरूच होता. यामुळे रावेर मधील वातावरण तणावपूर्ण झालं होत. या प्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Updated: Jul 3, 2014, 08:15 PM IST
डॉक्टरांच्या संपाचा राज्यात पहिला बळी title=

रावेर : डॉक्टरांच्या संपाचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये गेलाय. रावेरच्या सरदार जी. जी. हायस्कूलमधील शिपाई कल्पेश महाजन विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत. वैद्यकीय अधिकारी बी. बी. बारेला हजर नसल्याने संतप्त जमावाने रुग्णालयाच्या दिशेन जोरदार दगडफेक केली तसेच साहित्याची तोडफोड केलीय. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरूच होता. यामुळे रावेर मधील वातावरण तणावपूर्ण झालं होत. या प्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

मेस्मा अंतर्गत कारवाई करणार - सरकार
दरम्यान, संपावर गेलेल्या 12 हजार डॉक्टरांच्या विरोधात आता सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे. संपावर गेलेल्या डाँक्टरांच्या विरोधात मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची तयारी केलीय. यापूर्वीचं या डाँक्टरांना नोटीसा दिल्या असून संपावरून माघार घेतली नाही, तर संबंधित डाँक्टरावर मेस्माअंतर्गत कारवाई केली जाईल असं आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी सांगितलं. गेल्या 3 दिवसांपासून हा संप सुरु आहे.. डाँक्टर संपावर गेल्यानं ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फटका बसतोय. 

काय आहेत डॉक्टरांच्या मागण्या

 
  • 2009-10 मध्ये सेवेत समाविष्ट झालेल्या डॉक्टरांना पूर्वलक्षी लाभ द्या
  • डॉक्टरांचे कामाचे तास निश्चित करा
  • निवृत्ती वय 58 वरून 62 करावं
  • बीएएमएस वैद्यकीय अधिका-यांच्या पदोन्नती मार्गी लावणे
  • अस्थायी 789 BAMS डॉक्टरांचा वैद्यकीय अधिकारी गट ब मध्ये समावेश करा
  • 32 BDS डॉक्टरांचा गट ब मध्ये समावेश करावा
  • वरिष्ठ अधिका-यांना रखडलेल्या वेतनवाढीचा लाभ द्यावा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.