'भाजपचे म्हणणे खरे मानले तर...'; संविधान, आणीबाणीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
"गेल्या दहा वर्षांपासून भारत देश हा संविधानानुसार चालत नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपास चारशेच्या पार जागा मिळाल्या असत्या तर सध्याचे संविधान बदलून त्या जागी मोदी-शहा वगैरेंनी निर्माण केलेले नवे संविधान आणले असते, पण भारतीय मतदारांनी या मनसुब्यांना ब्रेक लावला," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लागवला आहे. "संविधान निर्मितीस 75 वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेत संविधानावर चर्चा सुरू आहे. संविधानाचे जे निर्माते होते त्यांनी अत्यंत विचारपूर्वक आपल्या संविधानाला आकार दिला आहे, पण आज आपण संविधानावर फक्त चर्चा करतो. देशाचा कारभार संविधानानुसार खरेच चालला आहे काय?" असा सावल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.
Dec 16, 2024, 06:56 AM IST