pressure cooker blast reason in marathi

डाळ बनवत असताना कुकरचा स्फोट, महिलेचा जागीच मृत्यू, 'ती' एक चूक बेतली जीवावर

स्वयंपाकघरात जेवण शिजवत असताना गृहिणी प्रेशर कुकरचा सर्रास वापर करतात. प्रेशर कुकरमुळे जेवणाचा वेळही वाचतो आणि गॅसचीही बचत होते. मात्र, प्रेशर कुकरचा वापर योग्य व्हायला हवा. अन्यथा तुमच्या छोट्याशा चुकीमुळं जीवावर बेतू शकते. जयपूरमध्येच एक भयानक घटना घडली आबे. स्वयंपाकघरात असलेल्या महिलेने डाळ बनवण्यासाठी कुकरचा वापर केला होता. डाळ बनवत असताना अचानक कुकरमध्ये अतिरिक्त प्रेशर तयार झाले आणि त्यामुळं कुकरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Aug 1, 2023, 12:24 PM IST