pslv c23

इस्त्रोनं सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, मोदींचं आवाहन

श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून आज सकाळी 9 वाजून 52 मिनिटांनी पीएसएलव्ही सी-23चं यशस्वी उड्डाण झालं. पंतप्रधान स्वत: यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं तोंडभरुन कौतुक केलं. शिवाय सार्क देशांसाठी सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, असं आवाहनही मोदींनी वैज्ञानिकांना केलं.

Jun 30, 2014, 12:22 PM IST

'PSLV सी-23'चं यशस्वी उड्डाण, अंतराळात भारताची भरारी

PSLV सी-23 या उपग्रह प्रक्षेपक यानाचं आज श्रीहरिकोटा इथल्या धवन अवकाश केंद्रातून उड्डाण झालंय. सकाळी 9.52 मिनिटांनी यान अवकाशात झेपावलं. या उड्डाणामुळं भारतानं अंतराळ क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Jun 30, 2014, 08:55 AM IST