10
10
वादळ आणि पावसामुळे लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 24 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात घडली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अखनूर युनीटमधील लेफ्टनंट डॉ. उमर फयाज हे आपल्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. यावेळी लग्नमंडपातून त्याचे दहशतवाद्यांनी अपहण केले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे आलेय.
पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. त्यांची याचिका फेटाळली.
आम आदमी पक्षातून हकालपट्टी झालेले दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना थेट निवडणुकीचे आव्हान दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी. ए. कर्नन यांना अवमान केल्या प्रकरणी दोषी ठरविलेय. त्यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
उत्तराखंड येथे टेम्पो दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील अमरावती येथील 4 भाविकांचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले आहेत.
जीसॅट-9 या दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ही एक ऐतिहासिक मोहीम असून प्रतिबद्धतेचे नवीन क्षितीज खुले झालेय, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केलेय.
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश कोट्याचा निर्णय कोर्टाकडून रद्द झालाय. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे स्थानिकांना 67 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.
विमानात गैरवर्तन करण्याला आता लगाम बसमार आहे. गैरवर्तन करणा-यांना कठोर शिक्षा होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.