10

नवीन शत्रू 'बेडरुम जिहादी', जम्मू- काश्मिरात सुरक्षा दलांसमोर आव्हान

 जम्मू-काश्मीरात सुरक्षा दलांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. 'बेडरुम जिहादी' हा नवा शत्रू निर्माण झालाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची डोकी भडकवली जात आहे.  

रेल्वेची क्रेडीट गुडन्यूज, आधी तिकीट काढा नंतर पैसे द्या!

रेल्वे प्रवासासाठी 'आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या' अशी नवी सेवा सुरु करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या गाड्यांना ही सेवा लागू होणार आहे.

संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान, हिंसा घडविण्यात दोन्ही काँग्रेसचा डाव : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्यावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. 

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर १.२३ रुपयांनी तर डिझेल ८९ पैशांनी महाग झाले आहे.

आता एक रुपयाची नोट चलनात

 नोटबंदीनंतर नव्याने ५०० आणि २०००च्या नोटा चलनात आल्यात. आता एक रुपयाची नोट चलनात येणार आहे.

मोरा चक्रीवादळाचा तडाखा , 6 नागरिकांचा मृत्यू

बांग्लादेशच्या किनाऱ्याला मोरा चक्रीवादळानं तडाखा दिलाय. यामध्ये किमान 6 नागरिकांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे.  

मिसिसिपीत अंधाधुंद गोळीबारात ८ जण ठार

अमेरिकेतील मिसिसिपीत झालेल्या गोळीबारात ८ जण ठार झालेत. यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

अबब, चंदा कोचर यांचा किती हा पगार?

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना ६७ टक्क्यांची वेतनवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे प्रतिदिन दोन लाख रुपये वेतन झाले आहे.

माजी पोलीस महासंचालक केपीएस गिल यांचे निधन

'सुपरकॉप', खालिस्तानी दहशतवाद्यांचा कर्दनकाळ, अशी ओळख असलेले पंजाबचे माजी पोलीस महासंचालक केपीएस गिल यांचे आज दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. 

भारतीय लष्कराची कारवाई, पाकिस्तानचे दोन बॅट कमांडो ठार

पाकिस्तानकडून सातत्याने नियंत्रण रेषेवर या ना त्या कारणाने उल्लंघन करण्यात येत आहे. आज उरी सेक्टरमध्ये गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून मोठा कट रचन्यात आला होता. मात्र, हा कट भारतीय जवानांनी उधळून लावताना पाकचे दोन बॅट कमांडो ठार केलेत.