10

गायकवाड आडनावाच्या भाजप खासदाराला विमानतळावर अडविले

सध्या शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. विमान कंपन्यानी त्यांच्यावर प्रवासाची बंदी घातली आहे. मात्र, गायकवाड आडनावामुळे भाजप खासदारांना याचा फटका बसला. त्यांनी थेट केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याकडेच तक्रार दाखल केलेय. 

जयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. अण्णाद्रमुकमधल्या पनीरसेल्व्हम आणि शशिकला यांच्यात या चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे.

राम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी

अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे. 

बाबरी मशिद प्रकरण : लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी?

बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा फैसला आता उद्यावर ढकलण्यात आला आहे. 

जीएसटी करप्रणालीचा मार्ग मोकळा, आणखी चार विधेयकांना कॅबिनेटची मंजुरी

देशात जीएसटी करप्रणाली 1 जुलैपासून लागू करण्याच्या दृष्टीनं आणखी एक महत्वाचं पाऊल आज टाकण्यात आलं. जीएसटी लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चार विधेयकांना आज केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली. 

आयडिया - व्होडाफोनचे विलिनीकरण, 40 कोटी ग्राहक

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आयडिया आणि व्होडाफोन यांच्या विलिनीकरणला आज आयडीयाच्या बोर्डाने मान्यता दिली.  या विलिनीकरणारमुळे तयार होणारी नवी कंपनी जवळपास 40 कोटी ग्राहकांना सेवा पुरवणार आहे.

तिसऱ्या कसोटीवर भारताची पकड, विजयाची संधी

भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आपली मजबुत पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची २ बाद २३ अशी अवस्था झाली आहे.

कार रेसर अश्विन, त्याची पत्नी यांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू

कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदीता यांचा आज पहाटे झालेल्या कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. शहरातील संतहोम हाय रोडवर भीषण अपघात झाला. 

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

नीटच्या परीक्षेसाठी विभागनिहाय केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयान याला हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती मिळतेय. यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

गोवा-मणिपूर सत्तेचे लोकसभेत पडसाद, काँग्रेसचा गदारोळ आणि सभात्याग

गोवा आणि मणिपूरमधील सत्तासंघर्षाचा मुद्दा लोकसभेत गाजला. गोवा आणि मणिपूरवरून लोकसभेत गदारोळ झाला. लोकसभेत काँग्रेसने बहिष्कार घालत सभात्याग केला. यावेळी ही तर लोकशाहीची हत्या, असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.